शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

पिंपरी महापालिकेकडून पावणे चारशे कोटींच्या विषयांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 20:21 IST

शुक्रवारच्या सभेत सुमारे पावणे चारशे कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे. वर्षांतील मंजुरीचा हा उच्चांक आहे.

ठळक मुद्देआळंदी-पुणे रस्ता, रस्ते विकासाची कामे, तसेच पंतप्रधान आवास गृहयोजनेचा विषय मंजूर

पिंपरी : महापालिकेतील स्थायी समितीची सभा सलग दोनवेळा तहकूब केली आहे. विषयपत्रिकेवर सुमारे दोनशे कोटींच्या विकासकामांचे विषय आहेत. विषयांवरून सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत होत नसल्याने सभा तहकूब केली जात होती. शुक्रवारच्या सभेत सुमारे पावणे चारशे कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे. वर्षांतील मंजुरीचा हा उच्चांक आहे. आळंदी पुणे रस्ता, समाविष्ठ गावांतील रस्ते विकासाची कामे, तसेच पंतप्रधान आवास योजनांच्या पिंपरी आणि आकुडीर्तील गृहयोजनेचा विषय मंजूर करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेची २६ डिसेंबरची सभा गणसंख्येअभावी तहकूब केली होती. तर नियमितपणे मंगळवारी होणारी सभा अभिनेते कादर खान आणि नगरसेवक बाबू नायर यांचे वडील एम. शंकरनारायणन नायर यांना श्रद्धांजली वाहून दोन्ही सभा शुक्रवारपर्यंत तहकूब केल्या होत्या.  सबळ कारण नाहीच कोणतेही सबळ कारण न देता सलग दोनवेळा स्थायी समितीची सभा तहकूब केली आहे. यामुळे आवास योजनेसह विविध महत्त्वाचे विषय लांबणीवर पडले होते. तर मागील सभेत आयत्यावेळी महापालिकेच्या महत्त्वाच्या मिळकतींवर डॉग स्कॉडमार्फत सुरक्षा व्यवस्था करणे, महापालिकेच्या रुग्णालयातील डी. आऱ सिस्टिमकरिता एक्स-रे फिल्म खरेदी करणे, पवनाथडी जत्रेच्या सभा मंडपासाठी ३२ लाख देणे असे विविध विषय दाखल केले आहेत. सभा तहकुबीची कारणे काहीही देण्यात येत असली तरी सत्ताधाºयांमध्ये एकमत होत नसल्याने सभा तहकूब केल्याचे वास्तव आहे. आजची सभा होणार की नाही याबाबत उत्सुकता होती. मात्र, सत्ताधाºयांत विषयाबाबत एकमत झाल्याने दोन्ही सभांचे कामकाज झाले. २६ तारखेच्या तहकूब सभेत ७६ विषय मंजूर करण्यात आले. त्यात सात विषय अवलोकनाचे होते. या सभेत एकूण २०३ कोटी ५४ लाखांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. तर एक जानेवारीच्या तहकूब सभेतील एकूण ४३ विषय मंजूर करण्यात आले आहेत. अवलोकनाचे आठ विषय होते. ते विषय सुमारे अकरा कोटींचे होते. त्यापैकी मागील सभा तहकुबीपूर्ण ऐनवेळी तेरा विषय दाखल करून घेण्यात आले होते. स्थायी समिती सभेत १५४ कोटी, ११ लाख ९२ हजारांचे विषय मंजूर करण्यात आले. मंजूरी दिलेले विषय१)आकुर्डी, पिंपरीतील गृहप्रकल्प (८४ कोटी) २) वायसीएमए रुग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासाक्रमासाठी आवश्यक कामे करणे (३२ कोटी)३) च-होली येथील चोविसवाडी, वडमुखवाडी अठरा मीटर रस्ता विकसित करणे (२०  कोटी) ४) विशालनगर जगताप डेअरी ते मुळा नदीवरील पुला पर्यंतचा रुंद रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करणे  (१४ कोटी)५) आकुर्डी रेल्वे स्टेशन ते गुरुद्वार चौकापर्यंतचा अठरा  मीटर रस्ता अर्बन डिझाईननुसार विकसित करणे (आठ कोटी ९१ लाख रुपये) ६) पुणे आळंदी रस्ता भाग एक आणि दोन - ८२ कोटी७) प्रभाग सहामध्ये २५ कोटी, विशालनगर येथे १३ कोटी, आकुर्डीत चोवीस मीटर रस्त्यासाठी ११ कोटी८) वायसीएम हॉस्पीटलमध्ये नवजात अर्भक विभाग नुतनीकरण- ३१ कोटी९) प्रभाग सात अठरा मीटर रस्ता- २० कोटी.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड