शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

Municipal Elections: पिंपरीत प्रभाग फोडाफोडीवर आणि प्रभागरचनेविरुध्द उच्च न्यायालयात दाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 19:53 IST

मुंबई उच्च न्यायालयात उद्या २५ मे रोजी सुनावणी

पिंपरी : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रभागरचनेत अनागोंदी, नियमबाह्य प्रकार झाल्याचा आरोप भाजपाने केला होता. प्रभागरचनेच्या विरोधात भाजपकडून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत प्रभागरचनेचे काम सुरू झाल्यानंतर, तसेच प्रारुप प्रभागरचनेनंतर वारंवार लेखी तक्रारी, हरकती घेण्यात आल्या. महापालिका व राज्य निवडणूक यंत्रणा यांच्याकडून कोणताही न्याय मिळाला नाही, असा आरोप भाजपाने केला होता. मडिगेरी यांनी अ‍ॅड. एस एम घोरवडकर  व अ‍ॅड. ऋतिक जोशी यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.

याचिकेतील आक्षेप

१) राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे महापालिकेमार्फत १ फेब्रुवारीला प्रारुप प्रभागरचना प्रसिध्द केली. त्यापूर्वी ३ महिन्यापूर्वी म्हणजे २५ नोव्हेंबर २०२१ रोजी अस्तित्वातील प्रभाग क्रमांक ८ चे तीन भागात चुकीच्या पध्दतीने मोडतोड होणार, सेक्टर १ संपूर्ण भाग वगळून नवीन भाग विठ्ठलनगर, लांडेवाडी झोपडपट्टी जोडणार आहेत, अशी तक्रार केली होती. त्यानंतर प्रभाग ८ मधील सेक्टर १, गवळीमाथा बाकी सर्व भाग १ असे याचे तीन तुकड्यात विभाजन केले.२) राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार राज्य सरकार ने विद्येयक मार्च २०२२ मध्ये पारित करून प्रभाग रचना रद्द करून आयोगाचे सर्व अधिकार काढून घेतले. राज्य सरकारच्या या विध्येयकाला आजतागायत स्थगित किंवा कायदा रद्द केले नाही. प्रभाग रचना रद्द करावी.३)  प्रारूपनंतर आरक्षण बदलण्याची तरतूद नियमात नाही. परंतु प्रभाग २ मध्ये एससी आरक्षण नव्हते सरासरी  पेक्षा १० टक्के कमी म्हणजे ३३ हजार ५५९ लोकसंख्या अपेक्षित आहे. परंतु त्याही पेक्षा१३९८ नी लोकसंख्या कमी करून ३२१६१ केले आहे.४)प्रभाग ५ मध्ये एसटी आरक्षण होते. तेथील एसटी आरक्षण कमी करून घेतले. ५१५४ लोकसंख्या प्रभाग ५ मधून काढून प्रभाग ७ मध्ये टाकली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या गैरकारभाराला चपराक बसेल

राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे हेतुपुरस्कर नियमबाह्य पध्दतीने प्रभागांची मोडतोड केली.  या नियमाबाह्य गैरप्रकारामुळे गोपनीयतेच्या भंग झाला आहे. न्यायालय सर्व पुरावे, माहितीच्या आधारे आम्हाला न्याय देईल आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या गैरकारभाराला चपराक बसेल असे याचिकाकर्ते विलास मडिगेरी यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूकpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड