शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दापोडी दुर्घटनेत आणखी एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 12:17 IST

ड्रेनेज लाइनसाठी खोदलेल्या खड्ड्यात मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने सात जण दबले गेले होते.

ठळक मुद्देमृतांची एकूण संख्या दोनवरअग्निशामक दलाचा जवान शहीद

पिंपरी : ड्रेनेज लाइनसाठी खोदलेल्या खड्ड्यात मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने सात जण दबले गेले होते. त्यातील पाच जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. रविवारी सायंकाळी घडलेल्या दापोडी दुर्घटनेतील अखेरचा मृतदेह सोमवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास एनडीआरएफच्या पथकाने बाहेर काढला. त्यानंतर ही शोधामुळे थांबविण्यात आली. या दुर्घटनेत एकूण दोघांचा मृत्यू झाला. महापालिकेचे फायर मन विशाल जाधव आणि नागेश कल्याणी जमादार अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. जाधव हे अग्निशामक दलाचे जवान असून जमादार हे मजूर आहेत. रविवारी सायंकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने जमादार हे दबले गेले, त्यांना काढण्यासाठी गेलेल्या दोन नागरिकांच्याही अंगावर मातीचा ढिगारा पडला. दोन नागरिकांची सुखरुपरित्या सुटका केल्यानंतर अग्निशामक दलाकडून जमादार यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू होते. त्यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळला. त्यात तीन जवान दबले गेले. यापैकी दोन जवानांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात अग्निशामक दलास यश आले. त्यानंतर विशाल जाधव यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. घटनास्थळी दाखल झालेल्या एनडीआरएफ यांच्या पथकाने पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास जमादार यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर हे शोधकार्य समाप्त झाले.या शोध व बचावकार्यात पिंपरी चिंचवड अग्निशामक दल, एनडीआरएफ, आर्मी पोलीस, शासन आणि मनपाचा वैद्यकीय विभाग, पाणीपुरवठा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय (तहसीलदार), स्वयसेवी संस्था आणि पिंपरी चिंचवड आपत्ती व्यवस्थापन विभाग, आदी सहभागी होते. 

टॅग्स :dapodiदापोडीDeathमृत्यू