शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक ! पत्नी आंघोळ करताना पतीने काढला व्हिडीओ; देहूरोड परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 16:37 IST

आरोपी हा फिर्यादीवर संशय घेत असून गेल्या चार ते पाच वर्षांपासून पत्नीला अशा पद्धतीने त्रास देत आहे.

पिंपरी : पत्नी आंघोळ करीत असताना पतीने तिचा व्हिडीओ काढल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीला पोलिसांनीअटक केली आहे. देहूरोड परिसरात २१ मे २०२१ रोजी ही घटना उघडकीस आली.

पीडित महिलेने याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. १८) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ४० वर्षीय आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा पती आहे. त्यांच्या दोन मुलींसह ते देहूरोड परिसरात वास्तव्यास आहेत. आरोपी हा फिर्यादीवर संशय घेत गेल्या चार ते पाच वर्षांपासून आरोपी हा फिर्यादी पत्नीला अशा पद्धतीने त्रास देत आहे. दोन्ही मुली तसेच पती घरात असताना फिर्यादी पत्नी त्यांच्या घरातील मोरीत आंघोळ करीत होती. त्यावेळी  आरोपी पतीने तिच्या नकळत तिचा व्हिडीओ काढला. हा प्रकार फिर्यादीच्या निदर्शनास आला. त्यामुळे त्यांनी याबाबत विचारणा केली. मात्र आरोपी पती तिला बधला नाही. त्यामुळे फिर्यादीने देहूरोड पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने पोलिसांनाही उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने व्हिडीओ काढल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याचा मोबाइल तपासला असता त्यात व्हिडीओ आढळून आला. त्यानुसार त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपीला मावळ तालुक्यातील वडगाव न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे-डिसोजा तपास करीत आहेत.

टॅग्स :dehuroadदेहूरोडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकWomenमहिला