... आणि वाघ नैवेद्य घेऊन पळाला
By Admin | Updated: November 14, 2016 02:53 IST2016-11-14T02:53:39+5:302016-11-14T02:53:39+5:30
सह्याद्रीच्या अतिदुर्गम तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी बांधवांनी वाघबारस साजरी केली. पूजेच्या वेळी ठेवण्यात आलेला नैवेद्य वाघाचे रुप

... आणि वाघ नैवेद्य घेऊन पळाला
डेहणे : खरपुड ( ता. खेड ) ह्या सह्याद्रीच्या अतिदुर्गम तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी बांधवांनी वाघबारस साजरी केली. पूजेच्या वेळी ठेवण्यात आलेला नैवेद्य वाघाचे रुप धारण केलेल्या पाच कार्यकर्त्यांनी रानात पळवून नेला. डोंगरकुशीतील आदिवासी निसर्गाचा उपासक आहे.
आधुनिक युगात मात्र लोप पावत चाललेली संस्कृती, निसर्ग पुजा व परंपरा यांना उजाळा मिळावा या भावनेने समाजातील काही तरुणांनी एकत्र येत वाघबारस साजरी केली. वृक्ष, वनस्पती हेच खरे पोशिंदे आहेत म्हणून त्यांना वनदेवता मानून वाघ बारस हा सण भिमाशंकर अभायारण्यात खरपुड गावातील जंगलात जुन्या परंपरेने मोठ्या उत्साहात साजरा केला.
वनदेवाला नैवद्य म्हणून खिर तयार करुन दाखवली जाते. जंगलातील वाघाला पळवून लावण्यासाठी खिर पळविणे व कडु असणाऱ्या चिबडे फेकुन वाघराला हाकलुन लावले जाते. एका सपाट दगडावर वाघोबाचे चित्र काढले समोर नैवेद्य ठेवण्यात आला. त्यानंतर पांच वाघांनी (कार्यकर्ते) तो नैवेद्य रानात पळवून नेला. थोड्या वेळाने ते कार्यकर्ते परत आले. वाघांनी शिकार खाउन आत्मा तृप्त केला, ते आता आपल्यावर हल्ला करणार नाहीत हि त्या मागची परंपरा आहे.
मंदोशी, खोपेवाडी, घोटवडी, पढरवाडी, तांबडेवाडी, भोमाळे, तोरणे आणि कुडे या गावच्या तरुणांनी एकत्र येऊन हा सण साजरा करुन लोप पावत चाललेला वारसा जपण्याचा संकल्प करीत साजरा केला. त्यानंतर आदिवासींच्या अडीअडचणी, वाद विवाद समाजातील समस्या यावर चर्चा करुन वनदेवासमोर दिलेला शब्द पाळला जातो. आमत्रंण देऊन सण साजरा केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते एकनाथ तळपे, तान्हाजी भोकटे यांनी दिली. (वार्ताहर)