अमृतानंदमयी मठाकडे एक कोटीची थकबाकी
By Admin | Updated: July 29, 2016 03:52 IST2016-07-29T03:52:57+5:302016-07-29T03:52:57+5:30
निगडी-प्राधिकरण येथील माता अमृतानंदमयी मठाच्या विश्वस्तांकडे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची एक कोटी पाच लाख रुपयांची थकबाकी असल्याचे उघड झाले आहे.

अमृतानंदमयी मठाकडे एक कोटीची थकबाकी
पिंपरी : निगडी-प्राधिकरण येथील माता अमृतानंदमयी मठाच्या विश्वस्तांकडे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची एक कोटी पाच लाख रुपयांची थकबाकी असल्याचे उघड झाले आहे. थकबाकी वसूल करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत असून न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
पेठ क्रमांक २१, यमुनानगरमध्ये माता अमृतानंदमयी मठाला २० रुपये प्रति चौरस मीटर या सवलतीच्या दराने आठ हजार ३२७ चौरस
मीटर एवढी जागा दिली होती.
मात्र, प्राधिकरणाच्या १९९६-९७ च्या विशेष लेखापरीक्षणामध्ये या किमतीला आक्षेप घेतल्यानंतर प्राधिकरणाने मठाच्या विश्वस्तांकडे अधिमूल्यातील फरकाची ३९
लाख ९६ हजार रुपयांची रक्कम मागितली. मात्र फरकाची ही रक्कम विश्वस्तांनी आतापर्यंत प्राधिकरणाकडे जमा केलेली नाही. त्यामुळे मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज असे एक कोटी पाच लाखांची थकबाकी आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते अॅड. मोहन अडसूळ म्हणाले, ‘‘एक कोटींची वसुली होणे गरजेचे आहे.’’
मुख्याधिकारी सुरेश जाधव म्हणाले, ‘‘प्राधिकरणातील माता अमृतनंदमयी मठाकडे अधिमूल्यातील फरकापोटी असलेली थकबाकी वसुलीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार सुरू
आहे. मठाच्या विश्वस्तांनाही पत्र दिले आहे.’’(प्रतिनिधी)