शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

परिचारिकेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा मुंबई-पुणे महामार्गावर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 5:48 PM

खासगी रूग्णालयात उपचारासाठी परिचारिकेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा मुंबई-पुणे महामार्गावर मालमोटारीने अचानक ब्रेक दाबल्याने अपघात झाला. या अपघातात परिचारिका गंभीर जखमी झाली आहे.

ठळक मुद्देप्रभा कोकाटे (वय ४५) असे जखमी झालेल्या परिचारिकेचे नाव गाडी दुसरीकडे वळविण्याच्या नादात नव्याने काम सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या भिंतीला धडक

पुणे: खासगी रूग्णालयात उपचारासाठी परिचारिकेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा मुंबई-पुणे महामार्गावर मालमोटारीने अचानक ब्रेक दाबल्याने अपघात झाला. या अपघातात परिचारिका गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात मंगळवारी (दि. २० ) रात्री साडेनऊच्या सुमारास घडला आहे. प्रभा कोकाटे (वय ४५, रा. पिंपळे गुरव, पुणे) असे जखमी झालेल्या परिचारिकेचे नाव आहे. नंदकुमार रामचंद्र भिंताडे (वय ५७, रा. विकासनगर, किवळे) असे रूग्णवाहिका चालकाचे नाव आहे. हे दोन्ही कर्मचारी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात कार्यरत आहेत. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, रूग्णालयातील परिचारिकेला संबंधित रुग्णवाहिकेतून (क्र. एमएच. १४. जीडी. ६८८८) पुढील उपचारासाठी चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात जात असताना देहूरोड येथील स्वामी विवेकानंद चौकाजवळ रुग्णवाहिकेच्या पुढे असणाऱ्या मालमोटारीने अचानक ब्रेक लावला. यावेळी रुग्णवाहिकेच्या चालकाने अपघात टाळण्यासाठी गाडी दुसरीकडे वळविण्याच्या नादात नव्याने काम सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या भिंतीला जोरदार धडक दिली. त्यात डाव्या बाजूला बसलेल्या परिचारिका कोकाटे यांच्या डोक्याला तसेच पायाला मार लागून जखमी झाल्या आहेत. 

टॅग्स :kiwaleकिवळेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात