पुणे: खासगी रूग्णालयात उपचारासाठी परिचारिकेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा मुंबई-पुणे महामार्गावर मालमोटारीने अचानक ब्रेक दाबल्याने अपघात झाला. या अपघातात परिचारिका गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात मंगळवारी (दि. २० ) रात्री साडेनऊच्या सुमारास घडला आहे. प्रभा कोकाटे (वय ४५, रा. पिंपळे गुरव, पुणे) असे जखमी झालेल्या परिचारिकेचे नाव आहे. नंदकुमार रामचंद्र भिंताडे (वय ५७, रा. विकासनगर, किवळे) असे रूग्णवाहिका चालकाचे नाव आहे. हे दोन्ही कर्मचारी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात कार्यरत आहेत. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, रूग्णालयातील परिचारिकेला संबंधित रुग्णवाहिकेतून (क्र. एमएच. १४. जीडी. ६८८८) पुढील उपचारासाठी चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात जात असताना देहूरोड येथील स्वामी विवेकानंद चौकाजवळ रुग्णवाहिकेच्या पुढे असणाऱ्या मालमोटारीने अचानक ब्रेक लावला. यावेळी रुग्णवाहिकेच्या चालकाने अपघात टाळण्यासाठी गाडी दुसरीकडे वळविण्याच्या नादात नव्याने काम सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या भिंतीला जोरदार धडक दिली. त्यात डाव्या बाजूला बसलेल्या परिचारिका कोकाटे यांच्या डोक्याला तसेच पायाला मार लागून जखमी झाल्या आहेत.
परिचारिकेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा मुंबई-पुणे महामार्गावर अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 17:57 IST
खासगी रूग्णालयात उपचारासाठी परिचारिकेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा मुंबई-पुणे महामार्गावर मालमोटारीने अचानक ब्रेक दाबल्याने अपघात झाला. या अपघातात परिचारिका गंभीर जखमी झाली आहे.
परिचारिकेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा मुंबई-पुणे महामार्गावर अपघात
ठळक मुद्देप्रभा कोकाटे (वय ४५) असे जखमी झालेल्या परिचारिकेचे नाव गाडी दुसरीकडे वळविण्याच्या नादात नव्याने काम सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या भिंतीला धडक