शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

माध्यमांचे स्वरूप बदलले तरी पत्रकारितेची भूमिका कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 16:45 IST

माध्यमांचे स्वरूप कालानुरूप बदलले असले तरी भूमिका मात्र बदललेली नाही,समाजमनाचा आरसा असे मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेची भूमिका कायम आहे,असा सूर माध्यमांचे बद्लते स्वरूप विषयावरील परिसंवादात उमटला.

पिंपरी  - माध्यमांचे स्वरूप कालानुरूप बदलले असले तरी भूमिका मात्र बदललेली नाही,समाजमनाचा आरसा असे मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेची भूमिका कायम आहे,असा सूर माध्यमांचे बद्लते स्वरूप विषयावरील परिसंवादात उमटला. भोसरी येथील रामस्मृती कार्यालयात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे 12 वे अधिवेशन घेण्यात आले, अधिवेशनाच्या निमित्ताने झालेल्या परिसंवादात मराठी पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसंत मुंढे, ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे, तुळशीदास भोईटे, अशोक सोनवणे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सहभाग नोंदवला. यावेळी लोकमत सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने तसेच चंद्रकांत झुरंगे आदी उपस्थित होते.जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक तुळशिदास भोईटे  म्हणाले, आर्थिक उद्देश ठेऊन काम करणारे २ टक्के  पत्रकार असतील, पण ९८ टक्के पत्रकार संवेदनशील आहेत.पत्रकारांनी नकारात्मक राहू नये.समाजमाध्यमामुळे बातमी लपून राहत नाही इतराकडून ती व्हायरल झल्यावर त्याची दखल घ्यावी लागते.त्यामुळे समाजमाध्यमे महत्वाची ठरू लागली आहेत. दै.जनशक्तीचे कार्यकारी संपादक पुरुषत्तोम सांगळे म्हणाले, वृत्तपत्र हे पुर्वी संपादकाच्या नावाने ओळखले जायचे पण आता मालकाच्या नावाने  ओळखली जातात. हा बदल दिसून येतो. आजची पत्रकारिता भरकटलेली आहे. असे बोलले जाते, पण पत्रकारांनी सकारात्मक रहावे.वंसत मुंढे म्हणाले,सोशल मिडीयामुळे प्रत्येक माणूस पत्रकार झालेला आहे. माध्यमाच स्वरुप बदलेले असले तरी पत्रकारितेची भुमिका तिच आहे. प्रबोधन,समाजशिक्षण हीच पत्रकारितेची भूमिका कायम आहे. पत्रकारितेचा चौथा स्तंभ हा वर्तमानपत्राच्या मालिकाता स्तंभ होतोय का अशी परिस्थिती निर्माण होतय.माध्यामांच स्वरुप जरी बदलल असले तरी माध्यमांची भुमिका मात्र तीच आहे. पत्रकार संरक्षण कायद्यात अनेक त्रुटी आहेत,पत्रकारांना सेवा निवृत्ती दिली पाहिजे समाजातीलदोन वर्ग अपेक्षित आहेत, त्यामध्ये शेतकरी आणि पत्रकार यांचा समावेश आहे. त्यांचेच प्रश्न सरकारकडून सोडविले जात नाहीत.पत्रकार आर्थिकदृष्या सक्षम असला पाहिजे. तरच तो पत्रकारिता करु शकतो. याचाही विचार झाला पाहिजे, शासनाने त्यांना पेन्शन दिली पाहिजे, स्वरुप बदलल तरी पत्रकारितेच भुमिका तिच राहणार फक्त सरकारने पत्रकारांच्या प्रश्नाकडे  लक्ष दिले पाहिजे.माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे म्हणाले, पत्रकारिता वेगवान झाली आहे. पत्रकाराच्या संरक्षणाबदल कडक कायदा व्हायला व्हावा. पत्रकारांना मुक्तपणे लिहिता यावे. त्यांच्यासाठी शासनाने संदर्भ  ग्रंथालय उपलब्ध करून द्यावेत.

टॅग्स :Mediaमाध्यमेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र