शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
2
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
3
विराट कोहली दोनदा शून्यावर बाद; सुनील गावसकरांनी मांडलं सडेतोड मत, म्हणाले- दोन सामन्यात...
4
मुख्यमंत्री फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार? चर्चांना उधाण...
5
Shraddha Walker : "श्रद्धा वालकरवर अजूनही अंत्यसंस्कार झालेच नाहीत"; आफताबने ३ वर्षांपूर्वी केलेली निर्घृण हत्या
6
Satara Crime: महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा पीएसआय गोपाल बदने फरार; महिला आयोगाने घेतली दखल
7
Social Media Earning: इन्स्टाग्राम आणि युट्यूबवरून कसे कमवता येतात पैसे? तुम्हीही बनू शकता लखपती! जाणून घ्या
8
एका जाहीरातीमुळे ट्रम्प यांची सटकली, थेट ट्रेड डीलवरील चर्चाच रद्द केली, काय होतं त्या जाहीरातीत?
9
सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनआक्रोश मोर्चा
10
Womens World Cup 2025 Semi-Final Schedule : टीम इंडियासमोर कोणत्या संघाचं असेल आव्हान?
11
"अशी घाणेरडी, गलिच्छ कृती केल्यास..."; सातारा महिला डॉक्टर प्रकरणात सुप्रिया सुळेंचा संताप
12
स्वतःला संपवू नका गं… तुम्हाला त्रास देणाऱ्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे - चित्रा वाघ
13
Phaltan Crime: संबंधित पोलिसांना निलंबित करा, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश
14
Mumbai Crime: लालबागमध्ये थरार! बॉयफ्रेंडपासून वाचण्यासाठी रस्त्यावर धावत सुटली तरुणी; नर्सिंग होममध्ये घुसताच...
15
भारतानेही ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून रशियन तेल खरेदी कमी केले; अमेरिकेचा पुन्हा दावा
16
१०१ वर्ष जुनी कंपनी आयपीओ आणणार, १६६७ कोटी रुपये उभारणार; 'या' दिवसापासून करता येणार गुंतवणूक
17
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
18
भुजबळांचा जामीन रद्द करुन मंत्रिमंडळातून बाहेर काढा; जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
19
बसखाली बाईक अडकली, आग उसळली, दरवाजे उघडेनात... २० प्रवाशांचा जळून मृत्यू! नेमकं काय घडलं?
20
टाटा ट्रस्टमधील वाद लवकरच संपणार? मेहली मिस्त्रींसाठी नवी ऑफर, समूहात वर्चस्व वाढणार

पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 20:17 IST

समन्यायी पाणी वाटप आणि अपूऱ्या  पाणीपुवठ्यावर पर्याय शोधणे, गळती, पाणी चोरी रोखण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणीपुरवठा विभागास दोन महिन्यांची मुदत दिली आहे.

पिंपरी : समन्यायी पाणी वाटप आणि अपूऱ्या  पाणीपुवठ्यावर पर्याय शोधणे, गळती, पाणी चोरी रोखण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणीपुरवठा विभागास दोन महिन्यांची मुदत दिली आहे. येत्या सोमवारपासून शहरात पूर्णदाबाने दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असून हा बदल दोन महिने राहणार आहे. ‘पाणीचोरी आळा, पाणीपुरवठ्यात सुधारणा न झाल्यास दोषी अधिकाºयांवर कडक कारवाई केली जाणार आहे. टँकर माफीयांवर गन्हे दाखल केले जाणार आहेत, असा इशारा हर्डीकर यांनी दिला आहे.

पवना धरण शंभर टक्के भरले असतानाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पिंपरी-चिंचवड शहरात गंभीर बनला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रशासनावर टीका केली जात आहे. ‘टँकर माफीयांवर कारवाई, बांधकामांना पाणी बंदी अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली होती. तर पाणी टंचाईस प्रशासन कारणीभूत असून यापुढे पाणीप्रश्नावर महापालिकेत येणार नाही, अशी भूमिका खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतली होती. याबाबत आज आयुक्त दालनात बैठक झाली. यावेळी महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे, सहशहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे आदी उपस्थित होते.

हर्डीकर म्हणाले, ‘‘पिंपरी - चिंचवडची लोकसंख्या आजमितीला २७ लाखांच्या आसपास आहे. त्यासाठी पवना धरणातून दररोज ५०० दलघमी पाणी उपसा केला जातो. त्यापैकी ३८ ते ४० पाण्याची गळती होते. ही पाणीगळती कमी करण्याचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. शहरात एक लाख ५० हजार नळजोड आहेत. वाढत्या लोकसंख्येचा चिवार करता आजमितीला ६०० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. समन्यायी पाणीवाटपासाठी चोवीस तास अखंड पाणीपुरवठा करणे, पाणीवितरण व्यवस्था मजबूत करणे, नळजोड बदलणे, जलवुंष्ठभ बांधणे आदी कामे सुरु आहेत. वाढती लोकसंख्या आणि ४० टक्के पाणीगळती विचारात घेता सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे पाण्याच्या दाबात वाढ होऊन तक्रारींचे प्रमाण कमी होईल.’’

टॅग्स :water shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक