खडकीत सर्व नियम बसविले धाब्यावर
By Admin | Updated: May 11, 2017 04:38 IST2017-05-11T04:38:15+5:302017-05-11T04:38:15+5:30
रात्री १२ वाजेपर्यंत उघडे असणारा पंजाबी ढाबा, आईस्क्रीमची दुकाने, चायनीज स्टॉल, तिथेच मद्यपींचा घोळका यामुळे खडकीची

खडकीत सर्व नियम बसविले धाब्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
खडकी : रात्री १२ वाजेपर्यंत उघडे असणारा पंजाबी ढाबा, आईस्क्रीमची दुकाने, चायनीज स्टॉल, तिथेच मद्यपींचा घोळका यामुळे खडकीची सुरक्षाव्यवस्था रामभरोसे झाली आहे. अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या खडकीत पोलिसांच्या आशीर्वादानेचया दुकानदारांचे फावले आहे. या ठिकाणी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वाहनतळाला या दुकानदारांनी स्व. राजीव गांधी चौपाटी असे नाव दिले आहे. संरक्षण विभागाच्या भिंतीला लागून या टपऱ्या बिनदिक्कतपणे सुरू असून या टपरीचालकांनी दुकान वाढवून दुकानासमोर टेबल खुर्च्या लावून संपूर्ण रस्ता बंद करून व्यवसाय करीत आहेत. आईस्क्रीमच्या दुकानासमोरही खुर्च्या रस्त्यावर मांडल्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी वाहतूक अडकून पडत आहे.