दुपारी बारापर्यंत सर्व निकाल
By Admin | Updated: August 6, 2015 03:35 IST2015-08-06T03:35:42+5:302015-08-06T03:35:42+5:30
मावळ तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या ३१६ जागासाठी रिंगणात असलेल्या ७१९ उमेदवारांच्या मत मोजणी गुरुवारी सकाळी ९ वा.

दुपारी बारापर्यंत सर्व निकाल
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या ३१६ जागासाठी रिंगणात असलेल्या ७१९ उमेदवारांच्या मत मोजणी गुरुवारी सकाळी ९ वा. मावळ तहसील कार्यालय महसुल भवन येथे होणार असुन १३७ मतदान केंद्राच्या मतमोजणीसाठी २० टेबल उभारले असुन ७ फेऱ्यात मत मोजणी होणार असल्याची माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली.
मावळ तालुक्यातील ताजे, कुरवंडे, कुसगाव पमा, आढे, उर्से, करंजगाव, बऊर, साई, गहुंजे, वारु, येलघोल, शिवली, शिवणे, थुगाव, तिकोणा, अजिवली, माळेगाव बुद्रुक, नाने, वेहरगाव, सोमाटणे, दारुंब्रे, खांडशी, शिरदे, आपटी, महागाव, कार्ला, साते, टाकवे बुद्रुक, वडेश्वर, आंबी, चिखलसे, कशाळ, नवलाख उंब्रे, डाहुली, धामणे, सांगवडे, परंदवडी, कुसगाव खुर्द,
घोणशेत, उकसान, मळवंडी ठुले, कोथुर्णे, मोरवे, येळसे, पाटण, मळवली व कुसगाव बुद्रुक या ४७ ग्रामपंचायतीमध्ये ८६.०३ टक्के मतदान झाले.
पोलीस निरीक्षक २, सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक ८, पोलीस कर्मचारी ८० व गृहसुरक्षा दल जवान २५ एकुण ११५ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी दिली. (वार्ताहर)