‘ग्यानबा-तुकाराम’चा गजर
By Admin | Updated: June 20, 2017 07:19 IST2017-06-20T07:19:04+5:302017-06-20T07:19:04+5:30
ग्यानबा-तुकाराम ग्यानबा-तुकाराम टाळ-मृदंगच्या तालावर संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पुणे महापालिका हद्दीत हॅरिस पुलावरून बोपोडी चौकात संत तुकाराममहाराजांची पालखी

‘ग्यानबा-तुकाराम’चा गजर
लोकमत न्यूज नेटवर्क
खडकी : ग्यानबा-तुकाराम ग्यानबा-तुकाराम टाळ-मृदंगच्या तालावर संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पुणे महापालिका हद्दीत हॅरिस पुलावरून बोपोडी चौकात संत तुकाराममहाराजांची पालखी येताच भव्य स्वागत करण्यासाठी पुणेकर सज्ज होते.
बोपोडी चौकामध्ये काँग्रेस पार्टी रुग्ण सेवा समितीतर्फे औषधाच्या बॉक्सचे वाटप करण्यात आले. जगत्गुरू संतशिरोमणी तुकाराममहाराज पालखीचे व सोहळा प्रमुखांचे स्वागत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बोपोडी येथे नगरसेविका सुनीता वाडेकर व परशुराम वाडेकर यांच्या वतीने भारतीय संविधान व पंचशीलचे उपरणे देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी परशुराम वाडेकर व नगरसेविका सुनीता वाडेकर उपस्थित होते.