शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवड पोटनिवडणुकीने खचून न जाता नव्या जोमाने कामाला लागा- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 14:10 IST

पुढील निवडणुकीमध्ये विजय नक्की असून खचून न जाता नव्या जोमाने कामाला लागा...

पिंपळे सौदागर (पुणे) :चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना नियोजनासाठी आणि प्रचारासाठी अत्यंत कमी वेळ मिळाला. असे असतानाही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्तम नियोजन केले. पुढील निवडणुकीमध्ये विजय नक्की असून खचून न जाता नव्या जोमाने कामाला लागा, अशा शब्दात अजित पवार यांनी महाविकास आघाडी व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना लाखाच्या आसपास मते मिळाली. गतवेळच्या निवडणुकीपेक्षा तब्बल ६० हजार मते अधिकची खेचण्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांना यश आले. मात्र, अगदी थोड्या फरकाने यशाने हुलकावणी दिली. अपक्ष उमेदवारामुळे महाविकास आघाडीतील मतांची फाटाफूट झाली. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रमुख कार्यकर्ते व नगरसेवकांनी शुक्रवारी (दि. १०) विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी नगसेवक संतोष कोकणे, विनोद नढे, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अविनाश गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. अजित पवार यांनी पोटनिवडणुकीत पडलेल्या मतांसह प्रभागनिहा व बुथनिहाय माहिती यावेळी घेतली. उपस्थितांना मागदर्शन करताना पवार म्हणाले, पोटनिवडणुकीसाठी आपल्याला अत्यंत कमी वेळ मिळाला. कमी वेळातही निवडणुकीचे अत्यंत उत्तम नियोजन करण्यात व मोठी मते मिळविण्यात सर्वांच्या कष्टामुळे यश मिळाले. विजय- पराजय हे निवडणुकीत होतच असतात. मात्र, आपल्याला मिळालेली मते ही आपली विश्वास द्विगुणीत करणारी आहेत. त्यामुळे खचून न जाता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत यश मिळविण्याच्या दृष्टीने आतापासून तयारीला लागा.

अधिवेशन संपल्यानंतर पिंपरी- चिंचवडमध्ये आपण बैठक घेणार असून, त्यावेळी पुढील निवडणुकांच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल. आपण राज्य शासन, महापालिकेच्या माध्यमातून केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या कामाला आतापासूनच लागा. पुढील निवडणुकांमध्ये मतदार आपल्यालाच संधी देतील आणि आपला विजय होईल, असा विश्वासही पवार यांनी यावेळी बोलून दाखविला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसchinchwad-acचिंचवड