शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar Passed Away : दादा आपल्यात नाहीत, ही जाणीवच मावळसह संपूर्ण महाराष्ट्राला स्तब्ध करून टाकणारी : सुनील शेळके 

By विश्वास मोरे | Updated: January 28, 2026 21:16 IST

दादा आपल्यात नाहीत, ही जाणीवच मावळसह संपूर्ण महाराष्ट्राला स्तब्ध करून टाकणारी आहे, अशा शब्दांत मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी भावना व्यक्त केल्या.

पिंपरी : महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देत वेगाने पुढे नेणारे, राज्याच्या राजकारणात ठाम निर्णयक्षमता, कार्यतत्परता आणि आपुलकीचा स्पर्श असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आकस्मिक जाणे अजूनही मनाला स्वीकारता येत नाही. दादा आपल्यात नाहीत, ही जाणीवच मावळसह संपूर्ण महाराष्ट्राला स्तब्ध करून टाकणारी आहे, अशा शब्दांत मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी भावना व्यक्त केल्या.

आमदार सुनील शेळके म्हणाले, दादांच्या विमानाला अपघात झाल्याची बातमी कळताच मनात अक्षरशः धस्स झाले. काही क्षणांतच विमानातील सर्वांचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि क्षणातच सगळं बदलून गेलं. हे खरं आहे, हे मान्य करायला मन तयार होत नाही. मावळच्या विकासाला एका उंचीवर नेताना दादांनी माझा हट्ट पुरवताना कधीही आढेवेढे घेतले नाहीत. मी जे जे मागितलं त्यापेक्षा कितीतरी अधिक त्यांनी दिलं. मावळचा विकास हा त्यांच्या मनात कायम होता. आज केवळ मावळच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झालेला आहे.  दादा आणि माझे घनिष्ठ संबंध गेल्या सहा-सात वर्षांपासूनचे होते. एकेक प्रसंग आठवला की आजही दादा नजरेसमोर उभे राहतात. जाहीर सभांमधील त्यांचे आश्वासक शब्द, आमदार म्हणून माझे लाड पुरवताना लोकांसमोर मिश्किल पण तितक्याच जिव्हाळ्याने केलेली टिप्पणी, आणि मावळातील जनतेवर असलेले त्यांचे खास प्रेम हे सगळं त्यांनी केवळ शब्दांत नाही तर कृतीतून दाखवून दिलं. मावळासाठी काहीच कमी पडू दिलं नाही. आज मी बारामतीत पोहोचलोय, पण मावळचा विकास आणि दादांचं नसणं, हे सगळंच एकदम अनाकलनीय वाटत आहे. नियतीनं हे काय केलं? सगळं इतकं अचानक, जणू काही क्षणात सगळंच संपल्यासारखं. दुःखाला परिसीमा नसते, हे फक्त ऐकलं होतं. आज ते प्रत्यक्ष अनुभवलं. अजितदादांचं जाणं हे उभ्या महाराष्ट्राला विचार करायला लावणारं, मन सुन्न करणारं दुःख आहे. दादा परत या, परत या असा टाहो मनात सुरू आहे. मी दादांकडे खूप हट्ट करायचो. आता तो हट्ट करायचा कुणाकडे? हा प्रश्न सतत मनाला बोचत आहे. आज दादांचा अखेरचा निरोप घेतानाचा हा क्षण पोरका करणारा आहे. दादांची काही स्वप्नं साकार करण्यासाठी मी जीवाचं रान करीन, त्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करीन. मात्र दादा आता नाहीत, ही खंत, हे दुःख, ही पोकळी कायम मनाला चटका लावत राहील. पवार कुटुंबियांच्या दुःखात सारा मावळ, मी आणि माझा संपूर्ण परिवार सहभागी आहे.  असा दादा पुन्हा होणं नाही, मिळणं नाही. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDeathमृत्यूPlane Crashविमान दुर्घटनाBaramatiबारामती