शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar Passed Away : शिस्तप्रिय उत्तम प्रशासक आणि संवेनदशील नेता 

By विश्वास मोरे | Updated: January 28, 2026 20:37 IST

पिंपरी- चिंचवड महापालिकेत राजेश पाटील यांची नियुक्ती अजित पवार यांनी केली होती.

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार आता आपल्यात नाहीत, यावर माझा विश्वासच बसत नाहीये. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखाच्या दिवसांपैकी एक आहे. सामान्य माणसांची दुःख जाणणारा, शिस्तप्रिय उत्तम प्रशासक आणि संवेनदशील नेता म्हणून ते मला भावले, असे सांगत होते पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त आणि आयएएस राजेश पाटील. पिंपरी- चिंचवड महापालिकेत राजेश पाटील यांची नियुक्ती अजित पवार यांनी केली होती. आठवण सांगताना राजेश पाटील म्हणाले, ' मला आजही स्पष्टपणे आठवतेय, आंतरराज्य प्रतिनियुक्तीवर रुजू झाल्यानंतर मी थेट त्यांच्या दालनात गेलो आणि त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी माझ्या धैर्याचे आणि धाडसाचे कौतुक केले आणि माझ्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली. पिंपरी चिंचवडचे आयुक्त म्हणून नियुक्ती केली. हा अनुभव मी सदैव जपून ठेवेन. ते नेहमीच सर्वांसाठी उपलब्ध असायचे, प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असायचे आणि भविष्याचा वेध घेणारे निर्णयक्षम नेते होते. त्या छोट्याशा कालावधीत मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो. ते आपल्या काळातील सर्वात प्रेरणादायी राजकीय व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. अशी व्यक्ती ज्यांच्यासोबत मला अत्यंत जवळून काम करण्याचे भाग्य लाभले.' सार्वजनिक कल्याणासाठी दिलेला बिनशर्त पाठिंबा राजेश पाटील म्हणाले, सकारात्मक दृष्टिकोन, विकासाभिमुख विचार आणि लोककल्याणासाठी असलेली अढळ बांधिलकी खरोखरच अतुलनीय होती. त्यांची दृष्टी आणि विचारांमधील स्पष्टता इतकी प्रभावी होती की, त्यांच्या टीमचा हिस्सा बनण्यासाठी कोणीही नैसर्गिकरित्या प्रेरित व्हायचे. महाराष्ट्रातील माझा अल्पसा कार्यकाळ त्यांच्यामुळेच संस्मरणीय ठरला; त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास, माझ्या क्षमतेवर ठेवलेला भरवसा आणि सार्वजनिक कल्याणासाठी दिलेला  बिनशर्त पाठिंबा मी कधीही विसरणार नाही.' प्रशाकीय शिस्त आणि हस्तेक्षेप नसे राजेश पाटील म्हणाले, 'अजित पवार हे माझ्यासाठी एक आदर्श राजकीय नेते होते. ज्यांनी आपल्या लोकांसाठी कधीही माघार घेतली नाही. मी पिंपरी चिंचवड शहरात २४ लक्ष स्केअर फुटांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. त्यावेळी स्थानिक नेत्यांनी तक्रारी केल्या. मात्र, ते माझ्या पाठीशी उभे होते. व्यापक जनहितासाठी ते कोणाचीही तमा बाळगत नसत. ते उत्तम प्रशासक होते. त्यांना एखाद्या कामांसाठी तोच माणूस पुन्हा आल्याचे आवडत नसे. त्यांचा साधेपणा, निरागसपणा भावतो. प्रशासकीय शिस्त आणि काटेकोरपणा त्यांना आवडत असे. प्रशाकीय कामात त्यांचा हस्तेक्षेप नसे. त्यांचे जाणे हे राष्ट्र आणि महाराष्ट्र राज्याचे, आणि विशेषतः आमच्यासारख्या लोकांसाठी जे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते, एक न भरून येणारे नुकसान आहे. त्यांचा वारसा सदैव टिकून राहो आणि त्यांच्यासोबत काम केलेल्या सर्वांना त्यांच्याकडून सार्वजनिक सेवेची मूल्ये आणि वचनबद्धता घेण्याची प्रेरणा मिळो. या महान सुपुत्राला हीच खरी श्रद्धांजली ठरेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's Demise: Disciplined Administrator and Sensitive Leader Remembered

Web Summary : Pimpri-Chinchwad Commissioner Rajesh Patil mourns Ajit Pawar's death, recalling his appointment and Pawar's support for public welfare. He highlights Pawar's administrative discipline, lack of interference, and commitment to the people. Patil emphasizes Pawar's inspirational leadership and unwavering support, marking his passing as a significant loss.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामतीPlane Crashविमान दुर्घटनाDeathमृत्यू