विद्यार्थिकेंद्रित अर्थसंकल्प हवा
By Admin | Updated: October 14, 2016 05:44 IST2016-10-14T05:44:25+5:302016-10-14T05:44:25+5:30
महापालिका शिक्षण मंडळाचे २०१७-१८ या पुढील वर्षातील विद्यार्थिकेंद्रित असलेले अंदाजपत्रक तयार झाले आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर

विद्यार्थिकेंद्रित अर्थसंकल्प हवा
पिंपरी : महापालिका शिक्षण मंडळाचे २०१७-१८ या पुढील वर्षातील विद्यार्थिकेंद्रित असलेले अंदाजपत्रक तयार झाले आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर अंदाजपत्रकांची अंमलबजावणी होईल. मात्र, निविदा प्रक्रिया वेळेत न झाल्यास विद्यार्थ्यांवर पुन्हा शालेय साहित्य मिळण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
दरवर्षी महापालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पाअगोदर शिक्षण मंडळातर्फे अंदाजपत्रक मांडले जाते. आगामी महापालिका निवडणुकीमुळे आचारसंहिता डिसेंबरमध्यचे लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाने आॅक्टोबर महिन्यातच शिक्षण मंडळाचा अर्थसंकल्प तयार केला आहे. यासाठी सुमारे १५१ कोटी ५ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या अंदाजपत्रकात टॅब खरेदी-प्रशिक्षण, ई-लर्निंग, गणवेश, शालेय साहित्य, पावसाळी साधने, वॉटर फिल्टर, सौरऊर्जा सिस्टीम, क्रीडा साहित्य, आगरोधक यंत्रणा, स्वेटर आदी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या गोष्टींचा समोवश करण्यात आला आहे. तसेच, मुलींच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचींही तरतूद सुचविली आहे.
निविदा प्रक्रियेमुळे दर वर्षी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळण्यास विलंब होतो. यामुुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. परंतु, या वर्षी शिक्षण मंडळाने पुढील वर्षाचे २०१७-१८चे अंदाजपत्रक आॅक्टोबरमध्येच तयार केले आहे. यामुळे डिसेंबरपूर्वीच या प्रस्तावास मंजुरी भेटेल, अशी शक्यता आहे. असे झाले तर शिक्षण मंडळास विद्यार्थिकेंद्रित असणाऱ्या या तरतुदी अंमलात आणण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकेल. एवढे असूनही पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना योग्य वेळेत शालेय साहित्य हातात मिळतील का, यावर शंका उपस्थित केल्या जात आहेत. शिक्षण मंडळाने तयार केलेल्या अर्थसंकल्पास लवकर मंजुरी मिळावी. तसेच, त्याची अंमलबजावणी तत्काळ व्हावी, अशी मागणी पालक व शिक्षक संघटनांकडून होत आहे. (प्रतिनिधी)