शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर-कल्याण राष्ट्रीय मार्ग मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 01:23 IST

अपघातांच्या प्रमाणात वाढ : दीड वर्षात ५० जणांचा गेला बळी

राजुरी : अहमदनगर-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अपघात होत असून, हा मार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे.

अहमदनगर-कल्याण राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. गेल्या दीड वर्षात महिन्यात जवळपास ४० ते ५० जणांनी आपला जीव या महामार्गावर गमावला आहे. पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याचे काम झाल्याने वाहनांचा वेग वाढला आहे.कल्याण-नगर महामार्गावर आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत (पेमदरा ते दांगटवाडी) तीस किलोमीटरच्या अंतरात १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत ४० अपघात झाले आहेत. यामध्ये दहा गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत. दुखापतीशिवाय पाच अपघात झाले आहेत. यात एकूण ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात २२ पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. गंभीर जखमी २५ झाले आहेत.

यात २0 पुरुष व पाच स्रियांचा समावेश आहे. चार ते पाच किरकोळ अपघात झाले असून, यात पाच पुरुष, तीन महिला जखमी झाले आहेत. अणे घाट उतरून येणाऱ्या वाहनांचा वेग जास्त असतो. गुळंवाडीजवळ रस्त्याला खड्डे पडल्याने ४४ अपघात झाले होते. खड्डे बुजले असले तरी वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघाताचे प्रमाण कमी झाले नाही. वाहनांच्या प्रचंड वेगामुळे समर्थ कॉलेजजवळ (बांगरवाडी) अपघात जास्त होतात. कॉलेजजवळ गतिरोधक नाही, त्यामुळे वाहनांचा वेग कमी होत नाही. येथेही अपघात मोठ्या प्रमाणात होतात. बेल्हे बायपासजवळ धोकादायक वळण आहे. येथे शाळा जवळच असल्याने विद्यार्थ्यांची येथे वर्दळ असते.

गतिरोधक असल्याने वाहनांचा वेग कमी होईल व अपघाताचे प्रमाण कमी होईल, अशी ग्रामस्थांना आशा आहे. अणे येथील सरदार पटेल हायस्कूलजवळ शालेय विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याने महामार्गावर गतिरोधक बसवण्यात आले. त्यामुळे तेथे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच राजुरी येथील गणेश सहकारी दूध संस्थेच्या गेटपाशी, तर राजुरी गावची स्मशानभूमी ही महामार्गाच्या कडेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात या ठिकाणी होतात.अपघातांसाठी चालकच जबाबदारमहामार्ग वा रस्त्यांवर होणाºया अपघातांची जबाबदारी ही शेवटी चालकाचीच असते. चालकच चुका करतात आणि अपघात होतात. मग तो चालक दुसºया गाडीचा असो वा कुणीही. तांत्रिक बिघाडामुळे अपघात होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. आपल्याकडे कोणीही उठतो आणि चालक होतो. महामार्गावर गाडी चालविण्याचे विशेष प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे; परंतु फारच थोड्या कंपन्या अशा प्रकारचे प्रशिक्षण देतात. ९० टक्के चालक हे प्रशिक्षणाविनाच गाडी महामार्गावर आणतात आणि मृत्यूच्या सापळ्यात अडकतात. यामध्ये चारचाकी वाहनधारकांचे प्रमाण जास्त आहे. 

वाहनचालकांनी धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करू नये. रस्त्यात कुठेही वाहने उभी करू नयेत. गाडीच्या वेगावर नियंत्रण असावे, चारचाकी वाहनचालकाने व प्रवाशाने सीटबेल्टचा वापर करावा. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, मद्यपान करून वाहन चालवू नये, असे आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. रस्त्याच्या नियमांचे पालन न केल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मत व्यक्त केले.टी. वाय. मुजावर, सहायक पोलीस निरीक्षक

टॅग्स :kalyanकल्याण