अहमदनगर-कल्याण राष्ट्रीय मार्ग मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:22 AM2019-01-16T01:22:47+5:302019-01-16T01:23:04+5:30

अपघातांच्या प्रमाणात वाढ : दीड वर्षात ५० जणांचा गेला बळी

Ahmednagar-Kalyan National Road to Death | अहमदनगर-कल्याण राष्ट्रीय मार्ग मृत्यूचा सापळा

अहमदनगर-कल्याण राष्ट्रीय मार्ग मृत्यूचा सापळा

googlenewsNext

राजुरी : अहमदनगर-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अपघात होत असून, हा मार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे.


अहमदनगर-कल्याण राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. गेल्या दीड वर्षात महिन्यात जवळपास ४० ते ५० जणांनी आपला जीव या महामार्गावर गमावला आहे. पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याचे काम झाल्याने वाहनांचा वेग वाढला आहे.
कल्याण-नगर महामार्गावर आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत (पेमदरा ते दांगटवाडी) तीस किलोमीटरच्या अंतरात १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत ४० अपघात झाले आहेत. यामध्ये दहा गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत. दुखापतीशिवाय पाच अपघात झाले आहेत. यात एकूण ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात २२ पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. गंभीर जखमी २५ झाले आहेत.

यात २0 पुरुष व पाच स्रियांचा समावेश आहे. चार ते पाच किरकोळ अपघात झाले असून, यात पाच पुरुष, तीन महिला जखमी झाले आहेत. अणे घाट उतरून येणाऱ्या वाहनांचा वेग जास्त असतो. गुळंवाडीजवळ रस्त्याला खड्डे पडल्याने ४४ अपघात झाले होते. खड्डे बुजले असले तरी वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघाताचे प्रमाण कमी झाले नाही. वाहनांच्या प्रचंड वेगामुळे समर्थ कॉलेजजवळ (बांगरवाडी) अपघात जास्त होतात. कॉलेजजवळ गतिरोधक नाही, त्यामुळे वाहनांचा वेग कमी होत नाही. येथेही अपघात मोठ्या प्रमाणात होतात. बेल्हे बायपासजवळ धोकादायक वळण आहे. येथे शाळा जवळच असल्याने विद्यार्थ्यांची येथे वर्दळ असते.

गतिरोधक असल्याने वाहनांचा वेग कमी होईल व अपघाताचे प्रमाण कमी होईल, अशी ग्रामस्थांना आशा आहे. अणे येथील सरदार पटेल हायस्कूलजवळ शालेय विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याने महामार्गावर गतिरोधक बसवण्यात आले. त्यामुळे तेथे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच राजुरी येथील गणेश सहकारी दूध संस्थेच्या गेटपाशी, तर राजुरी गावची स्मशानभूमी ही महामार्गाच्या कडेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात या ठिकाणी होतात.

अपघातांसाठी चालकच जबाबदार
महामार्ग वा रस्त्यांवर होणाºया अपघातांची जबाबदारी ही शेवटी चालकाचीच असते. चालकच चुका करतात आणि अपघात होतात. मग तो चालक दुसºया गाडीचा असो वा कुणीही. तांत्रिक बिघाडामुळे अपघात होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. आपल्याकडे कोणीही उठतो आणि चालक होतो. महामार्गावर गाडी चालविण्याचे विशेष प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे; परंतु फारच थोड्या कंपन्या अशा प्रकारचे प्रशिक्षण देतात. ९० टक्के चालक हे प्रशिक्षणाविनाच गाडी महामार्गावर आणतात आणि मृत्यूच्या सापळ्यात अडकतात. यामध्ये चारचाकी वाहनधारकांचे प्रमाण जास्त आहे.
 

वाहनचालकांनी धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करू नये. रस्त्यात कुठेही वाहने उभी करू नयेत. गाडीच्या वेगावर नियंत्रण असावे, चारचाकी वाहनचालकाने व प्रवाशाने सीटबेल्टचा वापर करावा. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, मद्यपान करून वाहन चालवू नये, असे आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. रस्त्याच्या नियमांचे पालन न केल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मत व्यक्त केले.
टी. वाय. मुजावर, सहायक पोलीस निरीक्षक

Web Title: Ahmednagar-Kalyan National Road to Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण