शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नाचक्की झाल्यानंतर हिंजवडीत प्रशासन लागले कामाला;अधिकाऱ्यांची एकत्रित पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 09:21 IST

: कायमस्वरूपी उपाययोजनेबाबत आमदारांच्या सूचना

हिंजवडी : मुसळधार पावसाच्या पाण्याखाली हिंजवडी आयटी पार्कमधील रस्ते गेल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवली. सर्व बाजूंनी नाचक्की झाल्यानंतर येथील प्रशासन कामाला लागले आहे. सोमवारी (दि.९) आयटी पार्क परिसरातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली.

आयटी परिसरात शनिवारी (दि.७) दुपारी चाळीस मिनिटे झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील रस्ते पाण्याखाली गेले. रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याने, परिसरातील वाहतूक ठप्प होऊन, वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कारभारावर सर्वच बाजूंनी टीकेची झोड उठली होती. त्यानंतर सोमवारी (दि.९) आयटी पार्क परिसरातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली. यावेळी स्थानिक आमदार शंकर मांडेकर तसेच स्थानिक सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, माण रस्ता, गवारे मळा, फेज तीन ते फेज दोन रस्ता ठिकाणाची पाहणी करण्यात आली. पावसाचे पाणी कशामुळे तुंबले, त्याची कारणे काय यावर सविस्तर चर्चा करून, याबाबत तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार मांडेकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

नैसर्गिक प्रवाह खुले करा

टीका होताच दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी सुटी असूनही, एमआयडीसी प्रशासनाने शक्य तेवढे चेंबर, नाले, ओढे साफ केले. सोमवारी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित पाहणी करून समस्या जाणून घेत कामाला सुरुवात केली. मात्र, दरवर्षी पावसाळ्यात आयटी पार्कमध्ये भीषण परिस्थिती उद्भवत असते. त्यामुळे तात्पुरती डागडुजी नको, तर कायमस्वरूपी उपाययोजना करा, अशा अपेक्षा आयटियन्स तसेच स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

पीएमआरडीए, एमआयडीसी, पीडब्ल्यूडी, वाहतूक विभाग तसेच स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन पाहणी केली. पुन्हा अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घेण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. नैसर्गिक प्रवाह खुले करून घेऊन नियमित साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाण्याचा निचरा होत नाही अशा ठिकाणी दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  - शंकर मांडेकर, आमदार, भोर.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र