फेरनिविदेनंतरच साहित्यखरेदी
By Admin | Updated: July 8, 2015 02:27 IST2015-07-08T02:27:33+5:302015-07-08T02:27:33+5:30
साहित्य खरेदीतील गैैरव्यवहार उघडकीस आणून नगरसदस्यांनी प्रखर विरोध केल्यानंतर मंगळवारी झालेल्या समितीच्या सभेत प्रिंटर, यूपीएस व नोटा मोजण्याचे मशिन बाजारभावापेक्षा

फेरनिविदेनंतरच साहित्यखरेदी
पिंपरी : साहित्य खरेदीतील गैैरव्यवहार उघडकीस आणून नगरसदस्यांनी प्रखर विरोध केल्यानंतर मंगळवारी झालेल्या समितीच्या सभेत प्रिंटर, यूपीएस व नोटा मोजण्याचे मशिन बाजारभावापेक्षा जादा दराने खरेदी करण्याचे प्रस्ताव दफ्तरी दाखल केले.
महापालिकेच्या विविध विभागांसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीचा प्रशासनाने सपाटा लावला आहे. मात्र, ही खरेदी बाजारभावापेक्षा दुप्पट, तिप्पट दराने करण्याचा घाट घातला आहे, करदात्या नागरिकांच्या डोळ्यांत धूळफेक करून ही खरेदी होत आहे. नोटा मोजण्याचे मशिन, यूपीएस व डिजिटल प्रिंटरची बाजारभावापेक्षा दुप्पट व तिप्पट दराने खरेदीचे प्रस्ताव स्थायीपुढे मंजुरीसाठी ठेवले होते. या तिन्ही साहित्यांच्या खरेदीसाठी केंद्र व राज्य सरकारच्या दरपत्रकांचा आधार घेतला नसल्याचे नगरसेविका सीमा सावळे व आशा शेंडगे यांनी समोर आणले. नोटा मोजण्याचे मशिन बाजारात साडेसात हजार रुपयांना उपलब्ध असताना अशा प्रकारच्या १३ मशिन प्रत्येकी दुप्पट दराने म्हणजे साडेचौदा हजार रुपयांना, डिजिटल प्रिंटर मशिन बाजारात २ लाख ८० हजार रुपयांना उपलब्ध असताना ३ लाख ९१ हजार रुपयांना आणि यूपीएस बाजारात १ लाख १० हजार रुपयांना उपलब्ध असताना ३ लाख २८ हजार रुपयांना खरेदीचा पालिकेने घाट घातला होता. त्याला नगरसेविका सीमा व शेंडगे यांनी विरोध केला. प्रस्ताव मंजूर करू नयेत, अशी मागणी त्यांनी आयुक्त व स्थायी अध्यक्षांकडे केली होती. (प्रतिनिधी)