शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जामिनासाठी बनावट कागदपत्रे बनविणारा वकील अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 13:22 IST

रोझरी एज्युकेशन ग्रुप फसवणूक प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी बनावट प्रतिज्ञापत्र..

ठळक मुद्देदोन वकिलांविरोधातही गुन्हा दाखल

पुणे :  रोझरी एज्युकेशन ग्रुप फसवणूक प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी बनावट प्रतिज्ञापत्र तयार करणाऱ्या  वकिलाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे़. तसेच बनावट प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी मदत करणाऱ्या दोघा वकिलां विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर मारुती ऊर्फ राजाभाऊ सूर्यवंशी (वय ४०,  रा. कोरेगाव पार्क) असे त्याचे नाव आहे़ शिमंतिनी कुलकर्णी आणि रशीद डी. सय्यद आणि त्यांना मदत करणाऱ्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विनय विवेक आरान्हा (वय ४४, रा. कॅम्प) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़. सूर्यवंशी यांच्यासह इतर तीन जणांवर  रोझरी एज्युकेशन ग्रुप प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ३० जून २०१८ मध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़.  या गुन्ह्यात सूर्यवंशी याने अटकपूर्व जामिन मिळावा यासाठी ८ फेब्रुवारी २०१९ मध्ये अर्ज दाखल केला होता. यासोबत त्यांचे वकिल शिमंतिनी कुलकर्णी यांनी प्रतिज्ञापत्र जोडले होते. न्यायालयीन कामकाजा दरम्यान फिर्यादी आरान्हा यांना सूर्यवंशी यांचे प्रतिज्ञापत्र मिळाले असता त्यांच्या लक्षात आले की, प्रतिज्ञापत्रावरील सही बनावट आहे. फिर्यादी यांनी आपल्या वकिलामार्फत ही गोष्ट न्यायालयाची निदर्शनास आणून दिली.  शिवाजीनगर पोलिसांनी प्रतिज्ञापत्रावर सूर्यवंशी याची बनावट सही असल्याचे न्यायालयात सांगितले. तसेच हे बनावट प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी नोटरी रशिद डी. सय्यद यांनी मदत केल्याचे सांगत जामिन अर्ज फेटाळण्याची मागणी केली होती.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस