शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

देहूत बीज सोहळ्यासाठी प्रशासनाची धावपळ, विविध कामे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 02:33 IST

अवघ्या चार दिवसांवर आलेल्या श्री संत तुकाराममहाराज बीजोत्सवाच्या निमित्ताने ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने कामाची लगबग सुरू झाली आहे.

देहूगाव : अवघ्या चार दिवसांवर आलेल्या श्री संत तुकाराममहाराज बीजोत्सवाच्या निमित्ताने ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने कामाची लगबग सुरू झाली आहे.शुक्रवारी (दि. २२) श्री संत तुकाराममहाराज बीजोत्सव म्हणजेच तुकाराम बीजसोहळा होत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच प्रशासनाने आढावा बैठक घेतली होती. बैठकीनंतर खऱ्या अर्थाने यात्रा तयारीला प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे.पिंपरी -चिंचवड महापालिका व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी देहूगावासह आळंदी रस्त्यावरील पथदिव्यांची दुरुस्ती केली. देहूगाव कमानीला लावण्यात आलेल्या दिव्यांचीही दुरुस्ती करण्यात आली. सध्या गावात ड्रेनेज लाइनचे काम अंतिम टप्प्यात असून, विठ्ठलनगरची ड्रेनेज लाइन गावातील मुख्य लाइनला जोडण्याचे काम वेगाने सुरू आहे. ही ड्रेनेज लाईन मुख्य वाहिनीला जोडण्याचे काम बीजेपूर्वी संपविण्याच्या दृष्टीने रात्रंदिवस प्रयत्न सुरू आहेत, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने देहू-आळंदी रस्त्याचे काम सुरू असून, ते समतल करून मजबूत करण्याचे काम सुरू आहे. यात्रेपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या दृष्टीने काम वेगात सुरू आहे.दरम्यान जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज यांच्या बीजोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाºया भाविकांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षितता, विविध कामांचे नियोजन याचा आढावा घेण्यासाठी प्रांताधिकारी सचिन बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक नुकतीच झाली. विविध कामांची तयारी व परिसराची पाहणी करण्यात आली. या वेळी शासकीय अधिकाºयांनी परिसराची पाहणी केली. येत्या बुधवारी (दि.२०) पुन्हा आढावा बैैठक घेण्यात येणार आहे. या वेळी कामाचा आढावा घेण्यात येईल.आरोग्याची काळजी : डीडीटीची फवारणीग्रामपंचायतीच्या वतीने नालेसफाईला सुरुवात केली आहे. अंतर्गत रस्त्यांवरील विद्युत दिव्यांची दुरुस्ती करण्याचे कामही सुरू आहे. गटारांची साफसफाई करून त्यावर डीडीटी पावडर फवारण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर यांनी सांगितले.यात्रेसाठी १९ तारखेपासून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये साध्या गणवेशातील पोलीस, गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस गस्तीवर असणार असून वाहतूक नियंत्रक पोलीस वेगळे असल्याचे पोलीस निरीक्षक धस यांनी सांगितले.श्री संत तुकाराममहाराज संस्थानाचे विश्वस्त अभिजीत मोरे यांनी वैकुंठस्थान मंदिर परिसरात सुरक्षितता ठेवण्याचे, तसेच वैकुंठस्थान परिसरात पालखी प्रदक्षिणेसाठी रस्ता तयार करण्याची मागणी आढावा बैठकीत करण्यात आली होती.

टॅग्स :dehuदेहूPuneपुणे