शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

पाणीप्रश्नावरून प्रशासन धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 5:12 AM

महापालिका परिसरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचे पडसाद स्थायी समिती सभेतही उमटले. नगरसेवकांची अधिकाºयांवर प्रश्नांची सरबत्ती करून धारेवर धरले.

पिंपरी : महापालिका परिसरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचे पडसाद स्थायी समिती सभेतही उमटले. नगरसेवकांची अधिकाºयांवर प्रश्नांची सरबत्ती करून धारेवर धरले. पाणीपुरवठा विस्कळीत होण्यास प्रशासन जबाबदार आहे. लोकप्रतिनिधींकडून तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली.महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून कचरा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सत्ताधारी नेते केवळ अधिकाºयांच्या आणि पदाधिकाºयांच्या बैठका घेण्यापलीकडे काहीही ठोस निर्णय घेत नाही. महापौर नितीन काळजे यांनी पाणी प्रश्न सुटला नाही, तर अधिकाºयांवर कारवाई करू असा इशारा एक महिन्यांपूर्वी दिला होता. भाजपाची सत्ता येण्यापूर्वी पाणीपुरवठा सुरळीत होता. एकवेळ पाणी असतानाही पूर्ण दाबाने पाणी मिळत होते. मग, पिण्याच्या पाण्याची कोंडी कोणी केली, असा सवालही काही नगरसेवकांनी उपस्थितकेला. तर काही सदस्यांनी अधिकारी ऐकत नाहीत, अशी हतबलताही दाखविली होती. तसेच आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांबाबत कबुली दिली होती. पदाधिकाºयांनी अधिकाºयांसमवेत बैठका घेऊनही प्रश्न सुटलेला नसल्याची नाराजी स्थायी समितीच्या सभेत व्यक्त केली.स्थायीच्या अध्यक्ष सीमा सावळेंसह सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आशा शेंडगे-धायगुडे म्हणाल्या, ‘‘पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. काही महिन्यांपूर्वी नव्हता. लोक म्हणतात, भाजपाची सत्ता आली आणि पाणी गेले. ही बाब गंभीर आहे. अधिकारी नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविताहेत काय? याची चौकशी करायला हवी.’’ या चर्चेत राजू मिसाळ, वैशाली काळभोर, उषा मुंढे, मोरेश्वर भोंडवे, अमीत गावडे, मोना कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. सर्वांनी आपापल्या भागातील तक्रारी सांगितल्या.टंचाईचे खापर सत्ताधाºयांवरअधिकाºयांमुळेच पाणीटंचाई होत आहे़ त्याचे खापर सत्ताधारी आणि नगरसेवकांवर फुटत आहे. याची चौकशी करण्याची गरज आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाण्याची गरज आहे. नागरिकांना वेठीस धरणाºया अधिकारी आणि कर्मचाºयांची गय केली जाऊ नये, अशीही मागणी सदस्यांनी केली.पिण्याच्या पाण्याचे भविष्यकालीन नियोजन लक्षात घेता भामा आसखेड, आंद्रा धरणातून पाणी आणण्यास गती मिळणार आहे. या विषयी सल्लागार नियुक्तीचा विषय मंजूर केला आहे. या संदर्भातील डीपीआर तयार झालेला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू होणार आहे. धरणातून थेट पाणी योजना राबविताना वेगवेगळ्या पर्यायांवर चर्चा सुरू आहे. नवलाख उंबरे येथे टाकी उभारून तेथून चिखली येथील जलउपसा केंद्रात पाणी आणू शकतो. तसेच देहूतही बंधारा बांधून तेथून पाणी आणता येईल. या सर्व शक्यतावंर डीपीआरनुसार काम सुरू आहे.- रवींद्र दुधेकर, प्रमुख, पाणीपुरवठा विभागपिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पाणी वितरण पद्धतीत काही दोष आहेत. ते दूर करणे गरजेचे आहे. ठेकेदारी पद्धतीने मजूर पुरविणाºया संस्थांचे काम बंद करून घंटागाडी कामगारांप्रमाणे व्हॉल्व्ह सोडण्याचे काम करणाºया मजुरांना एकरकमी पगारावर सेवेत घ्यावे, असा विचार पुढे आला आहे. त्यामुळे पाण्याच्या समस्या काही प्रमाणात सुटतील अशी अपेक्षा आहे. सर्वच भागांतून पिण्याच्या पाण्याच्या विषयी तक्रारी आहेत. सदस्यांसह नागरिकही तक्रारी करीत आहेत, त्यात तथ्य आहे. या विषयी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.- सीमा सावळे, अध्यक्षा, स्थायी समिती

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड