शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी महाराष्ट्राच्या हितासाठी नाही तर स्वत:च्या फायद्यासाठी- आदित्य ठाकरे

By रोशन मोरे | Updated: September 24, 2022 19:00 IST

गाजर नको तर रोजगार हवा....

पिंपरी : महाआघाडी सरकार सत्तेतून गेल्यापासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत अनेकदा गेले. मात्र, त्यांची ही दिल्लीवारी महाराष्ट्राच्या हितासाठी नव्हती. तर, स्वत:च्या फायद्यासाठी होती अशी टीका माजी मंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वडगाव मावळ येथे झालेले जनआक्रोश मेळाव्यात केली.वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प शिंदे फडणवीस सरकारमुळे गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वडगावमध्ये जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.

आदित्य ठाकरे म्हणाले, आजचा जनआक्रोश मोर्चा हा सर्वसामान्य तरुणाचा आवाज आहे. राज्यातील आणि मावळातील तरुण यांच्यात सरकारबाबत राग आणि आक्रोश आहे. महाविकास आघाडी सरकार असते तर वेदांत प्रकल्प मावळमध्ये आला असता आणि त्याचा जल्लोष आपण साजरा केला असता. गेल्या दोन ते तीन महिन्यांत तरुणांना रोजगार मिळेल की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

प्रकल्प गेल्याचे दुख: नाही पण...

वेदांताचे प्रमुख यांनी प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याचे दुःख नाही, कारण महाराष्ट्र प्रगत राज्य आहे आणि आपण आपली जागा निर्माण केली आहे. देशातील रोजगार ज्यांना आपल्याकडे खेचून नेऊशी वाटतो त्या राज्याबाबत मला काही वाटत नाही. कारण प्रत्येक भागाचा विकास झाला पाहिजे. परंतु महाराष्ट्रमध्ये येणारा निश्चित प्रकल्प दुसरीकडे हलवणे अयोग्य आहे. 

गाजर नको तर रोजगार हवामहाराष्ट्राला आश्वासनांचे गाजर नको रोजगार हवा आहे. आम्ही सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी पाठपुरावा करत आहे. राज्यातील महत्वपूर्ण प्रकल्प राज्याबाहेर हलवले गेल्याने दोन लाख रोजगार हिरावले गेले आहे.ही घटना दुसऱ्या राज्यात घडली असती तर उद्योगमंत्री यांनी राजीनामा दिला असता अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रAditya Thackreyआदित्य ठाकरे