शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोग ग्रस्त रुग्णांसाठी अदितीचा ‘धाडसी’ निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 14:12 IST

तिचं वय तसं फार नाही जेमतेम चौदा वर्ष..पण या लहान वयात तिने दाखवलेल्या संवेदनशीलतेला खरोखर सलाम केलाच पाहिजे.

ठळक मुद्देचिंचवड मधील तेरा वर्षीय चिमुरडीने केले केस दान

पराग कुंकुलोळ चिंचवड: काळेभोर लांब केस हे महिलांचं मुख्य आकर्षण.. पण हे केस कर्करोग ग्रस्तांना उपयोगी पडतात हे समजल्यावर तिने चक्कं आपले काळेभोर केस कापत त्याचे एका सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेला दान करण्याचे धाडस दाखवले. तिचं वय तसं फार नाही तर जेमतेम चौदा वर्ष..पण या लहान वयात तिने दाखवलेल्या संवेदनशीलतेला खरोखर सलाम केलाच पाहिजे. या सामाजिक जाणिवे ओळख अधोरेखित करणाऱ्या मुलीचे नाव आहे अदिती जैन.     चिंचवड मधील हे जैन कुटुंबिय जैन सोशल ग्रुप पिंपरी-चिंचवडच्या माध्यमातून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. मृत्यूपश्चात अवयव दानाची मोहीम सध्या जैन सोशल ग्रुपकडून राबविण्यात येते.याच कार्यातून दानाची महती मिळालेल्या अदितीने मुंबईतील कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी काम करणाऱ्या ‘मदत चॅरिटेबल ट्रस्ट' या संस्थेला तिने स्वत:चे केस कापून दान केले आहेत. तिच्या या दानशूर वृत्तीचे सर्वच स्तरांमधून कौतुक होत आहे. पाचवीत शिक्षण घेणारी अदिती आपल्या आई-वडिलांसोबत एका कर्करोगग्रस्त महिला नातेवाईकांना भेटण्यासाठी गेली होती. तेव्हा उपचारा घेणाऱ्या महिलेला केस नसल्याचे तिच्या लक्षात आले. याबाबत तिने पालकांना विचारले असता अशा रुग्णांना या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे तिला कळाले. अशा महिलांना कोणी केस दान केले तर मुंबईमधील संस्था या केसांचे टोप बनवून कर्करोग महिलांना देत असल्याचे तिला समजले. तेव्हा तिने क्षणाचाही विलंब न करता स्वत:चे केस या संस्थेला दान करण्याची इच्छा पालकांकडे व्यक्त केली. अदितीची आई अपर्णा जैन यांनी ही गोष्ट तिच्या वडिलांना सांगितली .तिचे वडील जितेंद्र जैन यांनी मुलीच्या या निर्णयाचे स्वागत करत मुंबईतील 'मदत चॅरिटेबल ट्रस्ट' या संस्थेशी संपर्क साधत त्यांनी मुलीची इच्छा व्यक्त केली. अदितीने लागलीच आपले केस कापून त्या संस्थेकडे पाठविले.अदितीने दाखवेलल्या धाडसाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. तसेच तिचे समाजातून कौतुक देखील होत आहे.कर्करोगग्रस्त रुग्णांच्या उपचारा दरम्यान त्यांना केस गमविण्याची वेळ येते. त्यांना पुन्हा केस येत नाहीत अशा घटनेत त्यानां केसांचा टोप बसवावा लागतो. यासाठी काम करणाऱ्या संस्थेला समाजातून सहकार्य मिळणे आवश्यक असल्याचे जैन कुटुंबीय सांगत आहेत. मुलांमध्ये लहान वयातच सामाजिक कार्य करण्याचे विचार रुजवणे गरजेचे आहे. जैन सोशल ग्रुपच्या माध्यमातून नेत्रदान,अवयवदान,श्रमदान व  शैक्षणिक दानाचे कार्य केले जाते. 

टॅग्स :Puneपुणेcancerकर्करोगHealthआरोग्य