भोसरीत दोन गटांत हाणामारी

By Admin | Updated: May 11, 2017 04:42 IST2017-05-11T04:42:25+5:302017-05-11T04:42:25+5:30

महिलेला धक्का लागला या कारणावरून भोसरी, खंडेवस्ती येथे मंगळवारी रात्री साडेनऊला दोन गटांत हाणामारी झाली. तलवार

Action in two groups in Bhosari | भोसरीत दोन गटांत हाणामारी

भोसरीत दोन गटांत हाणामारी

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : महिलेला धक्का लागला या कारणावरून भोसरी, खंडेवस्ती येथे मंगळवारी रात्री साडेनऊला दोन गटांत हाणामारी झाली. तलवार आणि धारदार शस्त्रांचा हाणामारीत वापर झाला. त्यामध्ये दोनजण जखमी झाले असून, दोन्ही गटांतील १४ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल भरत खरात (वय २७) याने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार प्रवीण लांघे, बलजीतसिंग जोहरसिंग भोंड, पैतरसिंग भोंड,पांडुरंग बाजीराव लंघे, प्रमोद कैलास रांदळ, पवित्रसिंग जोहरसिंग भोंड या सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलजीतसिग, पांडुरंग, प्रमोद या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी फिर्यादीवर वार करून गंभीर जखमी केले आहे. फिर्यादीस जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याच घटनेत स्वप्नील बल्ला (वय २४,रा.लोहियानगर) याने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, विशाल खरात याने शक्तिसिंग यांच्या पत्नीची छेड काढली होती.

Web Title: Action in two groups in Bhosari