बेकायदा दारूविक्रेत्यांवर रावेतमध्ये कारवाई
By Admin | Updated: September 24, 2015 03:01 IST2015-09-24T03:01:34+5:302015-09-24T03:01:34+5:30
बंगळूर-मुंबई महामार्गावर रावेत येथील भुयारी मार्गाजवळ पंजाबी रसोई या हॉटेलवर देहूरोड पोलिसांनी छापा घालून सुमारे पावणेआठ हजारांचा दारूसाठा जप्त केला असून

बेकायदा दारूविक्रेत्यांवर रावेतमध्ये कारवाई
किवळे : बंगळूर-मुंबई महामार्गावर रावेत येथील भुयारी मार्गाजवळ पंजाबी रसोई या हॉटेलवर देहूरोड पोलिसांनी छापा घालून सुमारे पावणेआठ हजारांचा दारूसाठा जप्त केला असून, एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांना या हॉटेलमध्ये बेकायदा दारूविक्री होत असल्याची, माहिती मिळाल्याने सहायक निरीक्षक अजित दळवी व सतीश शिंदे यांच्यासह पोलीस पथकाने तातडीने हॉटेलवर छापा घातला. याप्रकरणी हॉटेलमालक जॉय चॅटर्जी, गिरीश रोहिडा, विसू बावेजा, तसेच कर्मचारी पिंटू प्रताप दास (वय २८ ), मिहीर रमाकांत भट (४३), मांगीलाल हरीलाल कुडीवान (२५), प्रदीप चोपडा (४९), आफताब अब्दुल करीम खान (३०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)