शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कारवाई; पिंपरी-चिंचवड पोलिसांची करडी नजर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 17:08 IST

पोलिसांकडून सोशल मीडियातून पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, तसेच त्याला बळी पडू नये असे आवाहन

ठळक मुद्देव्हाटस अप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टिकटॉक व्हिडीओ अशा सोशल मीडियावर नजर

पिंपरी : सांगवी येथील पिंपळे सौदागर येथे झालेल्या खून प्रकरणाला जातीय रंग देऊन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज टाकले जात आहेत. अशा पोस्टवर पिंपरी-चिंचवडपोलिसांची करडी नजर आहे. तसेच सामाजिक सलोखा बिघडविल्यास कठोर कारवाई होईल, असे पिंपरी-चिंचवडपोलिसांकडून सांगण्यात आले आहे.सांगवी येथील पिंपळे सौदागर परिसरात एका तरुणावर शस्त्राने वार करून त्याला जखमी केले. त्याचा उपचारादरम्यान ८ जून रोजी मृत्यू झाला. याबाबत सहा जणांवर अनुसूचित जाती जमाती अधिनियम आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील सहा जणांना अटक केली. करण्यात आली असून सध्या ते आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहेत. या प्रकरणाचा तांत्रिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने सखोल तपास सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव करीत आहेत.

या प्रकरणाला काही समाजकंटक जाणीवपूर्वक जातीय सलोखा बिघडविण्यासाठी खोडसाळपणे प्रक्षोभक, आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस व्हाटस अप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, हॅलो, टेलिग्राम व टिकटॉक व्हिडीओ अशा सोशल मीडियावर नजर ठेऊन आहेत.

सोशल मीडियातून पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, तसेच त्याला बळी पडू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्यांवर पोलिसांकडून प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिसMurderखूनArrestअटक