अतिरिक्त आयुक्तपदी अच्युत हांगे

By Admin | Updated: June 1, 2017 16:26 IST2017-06-01T16:26:34+5:302017-06-01T16:26:34+5:30

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी तानाजी शिंदे यांच्याकडून अच्युत हांगे यांनी गुरुवारी स्विकारली. तानाजी शिंदे यांची सेवा महसूल व वनविभागात बदली करण्यात आली आहे,

Achyut Hange as Additional Commissioner | अतिरिक्त आयुक्तपदी अच्युत हांगे

अतिरिक्त आयुक्तपदी अच्युत हांगे

>ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 01 - महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी तानाजी शिंदे यांच्याकडून अच्युत हांगे यांनी गुरुवारी स्विकारली. तानाजी शिंदे यांची सेवा महसूल व वनविभागात बदली करण्यात आली आहे,
महाराष्ट्र नगरविकास विभागाकडून बदलीचा आदेश जारी करण्यात आला होता. त्यानुसार ही बदली करण्यात आली. अच्युत हांगे यांनी यापूर्वी मिरा -भाईंदर महापालिकेच्या आयुक्तपदी काम केले. त्यांनी नागपूर, भिवंडी, अहमदनगर, या महानगरपालिकेत विविध पदावर काम केले आहे. नागपूर महापालिकेत महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्या कार्यकाळातही तीन महिने प्रशासन सेवा केली आहे. हांगे हे बीड जिल्ह्यातील हांगेवाडी येथील आहेत. 
तानाजी शिंदे हे 30 जून 2013 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावर रुजू झाले होते. त्यांनी पूर्वी देखील पिंपरी महापालिकेत सहायक आयुक्त म्हणून काम पाहिले होते. पिंपरी महापालिकेतील प्रतिनीयुक्तीची त्यांची तीन वर्षाची मुदत संपली होती.

Web Title: Achyut Hange as Additional Commissioner