शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गैरव्यवहारावरून आरोपप्रत्यारोप, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 03:24 IST

महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या कारभाराला विरोधी पक्षांनी लक्ष केले आहे. गैरव्यवहाराच्या प्रकारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोलवा-टोलवी सुरू झाली आहे.

पिंपरी : महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या कारभाराला विरोधी पक्षांनी लक्ष केले आहे. गैरव्यवहाराच्या प्रकारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोलवा-टोलवी सुरू झाली आहे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितल्यानंतर सत्ताधारी-विरोधकांतील संघर्ष तीव्र होऊ लागला आहे. शहरातील घरोघरचा कचरा गोळा करण्याच्या कामात अडीचशे कोटींचा झोल झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केल्याने सारवासारव करण्यात सत्ताधा-यांची दमछाक होऊ लागली आहे.‘आरोप बिनबुडाचे असून शवदाहिनीत भ्रष्टाचार करणाºयांनी बोलू नये, राष्ट्रवादीची प्रकरणे बाहेर काढू, असे प्रत्युत्तर महापौर नितीन काळजे व पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिले आहे.समाविष्ठ गावातील ४२५ कोटींच्या रस्ते विकासकामांच्या निविदांत रिंग झाल्याचा आरोप खासदार आढळराव, श्रीरंग बारणे आणि भाजपाचे खासदार अमर साबळे यांनी केला. त्यानंतर शिवेसना गटनेते राहुल कलाटे यांनी वाकड येथील कामात होणारी रिंग मोडून काढली. त्यानंतर राष्टÑवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपो येथे नेण्याच्या नव्या कामांतून २५२ कोटींच्या घोटाळ्याची शक्यता व्यक्त केली. ‘‘शहराच्या दोन भागाची विभागणी करून भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा खर्च काढायचा आहे. भाजपावाले अ‍ॅनाकोंडा असून पैसे गिळूनटाकत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीने केला होता.राष्टÑवादीच्या आरोपांना महापौर व पक्षनेत्यांनी पत्रकार परिषेद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. पक्षनेते पवार म्हणाले, ‘‘कचरा संकलन वहनाबाबत केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. राष्ट्रवादी पराभवाच्या गर्तेतून बाहेर आली नाही. त्यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे. आम्ही राष्ट्रवादीची अनेक प्रकरणे उघडकीस आणू शकतो.’’सत्ताधाºयांमुळे प्रशासनाची दमछाकविविध विकासकामे त्यांच्या निविदा सत्ताधारी काढत आहेत़ मात्र, यामुळे प्रशासन अडचणीत येऊ लागले आहेत. सत्ताधाºयांवरील आरोपांचा खुलासा प्रशासनच करीत आहे. खासदारांच्या तक्रारींची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे दिवसामागून एकेक प्रकरणे उघड होत असताना प्रशासनाची उत्तरे देण्यात दमछाक होऊ लागली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड