अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका
By Admin | Updated: October 11, 2016 01:28 IST2016-10-11T01:28:53+5:302016-10-11T01:28:53+5:30
रस्त्यावर वर्दळ असताना त्यात अवजड वाहनांसह इतर प्रवासी वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्यामुळे डांगे चौकात अपघाताची शक्यता

अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका
वाकड : रस्त्यावर वर्दळ असताना त्यात अवजड वाहनांसह इतर प्रवासी वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्यामुळे डांगे चौकात अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
या वाहनांमुळे हिंजवडीकडे जाणाऱ्या प्रवाशांना उभे राहण्यासाठीदेखील जागा नसल्यामुळे रस्त्यावरच उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. हातगाड्याही उभ्या राहत असल्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही अवघड झाले आहे. हिंजवडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वर्दळ असते. (वार्ताहर)