शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - मुंबई एक्सप्रेसवेवर कंटेनरला बस धडकून अपघात ; बस चालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 12:03 IST

पुणे - मुंबई एक्सप्रेसवेवर अचानक कंटनेर बंद पडल्याने मागून आलेल्या बसची जाेरदार धडक बसली. यात बस चालकाचा मृत्यू झाला आहे.

कामशेत : पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर कामशेत शहराजवळ बौर गावाच्या हद्दीत कंटेनर लेन सोडून चालला असता अचानक बंद पडल्याने मागुन येणाऱ्या बसने कंटेनरला मागुन आलेल्या खासगी बसने धडक दिली. यात चालकाचा मृत्यू झाला असून क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत हद्दीतील बौर गावच्या किलोमीटर नं. ७३/९२५ जवळ रविवार (दि. २२) रोजी सकाळी ५.१५  ते ५.३० वाजण्याच्या सुमारास चेन्नई कडुन भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर ( क्र. एच आर ५५ ए डी ३९२८ )  हा चुकीच्या लेनने चालला होता. त्यात हा कंटेनर रस्त्यात अचानक बंद पडला. यावेळी मागुन येणाऱ्या अक्कलकोट - मुंबई या लक्झरी बस ( क्र. एम एच ०३ सी पी ९९०३ ) ची कंटेनरला मागुन जोरदार धडक बसली. या अपघातात बस चालक रमेश संजय कबाडे (वय २४ रा. म्हाडा, सोलापूर ) याचा मृत्यू झाला असुन बसचा क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे. कंटेनर चालकाचे नाव मौहमद सइद खान (रा. अब्दुल्ला नगर,शहाबाद, हरियाना) आहे.

जखमीवर सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDeathमृत्यू