शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 02:58 IST

पिंपरी-चिंचवड शहराचा विकास आणि विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर अपघातामध्ये मृत्युमुखी पडणा-यांची संख्या वाढली असून, त्यामध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

मोशी : पिंपरी-चिंचवड शहराचा विकास आणि विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर अपघातामध्ये मृत्युमुखी पडणा-यांची संख्या वाढली असून, त्यामध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.बहुतांश अपघात हे चालकांच्या चुकीमुळेच होतात. वाहनात तांत्रिक बिघाड होऊन अपघाताचे प्रमाण फारच कमी आहे. यामुळे महामार्ग किंवा शहरात वाहन चालविणाºयांना विशेष प्रशिक्षण देण्याची गरज आहे. मात्र आपल्याकडे प्रशिक्षणाशिवाय वाहन चालविणाºयांचे प्रमाण अधिक आहे. रस्त्याची रुंदी तर वाढली; मात्र अपघातांची संख्याही वाढली आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्याने नागरिक स्वत:ची दुचाकी वाहने प्रवासाकरिता वापरतात. त्यामुळे दुचाकी अपघातांत मृत्युमुखी पडणाºयांची संख्या जादा आहे.दिवसा प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलीस असतात. मात्र रात्रीच्या वेळी पोलीस नसल्याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. भरधाव वाहन चौकात आल्यावर त्याचा दुसºया वाहनाशी अपघात होतो. चौकात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयामुळे अशा अपघातात चूक कोणाची, हे समजत असले तरी गेलेला जीव परत येऊ शकत नाही. हेल्मेट दुचाकीला अडकवून दुचाकी चालविणाºया एका २२ वर्षीय विवाहित तरुणीचा रस्ता दुभाजकाला धडकून डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याची घटना याच आठवड्यात भोसरी येथे घडली. जर त्यांनी हेल्मेट घातले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता.जखमींवर वेळेत उपचार नाहीतअपघात झाल्यावर अनेकदा जखमी कित्येकवेळ रस्त्यावर पडून असतो. मात्र नागरिक त्यास रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करीत नाहीत किंवा पोलिसांनाही कळवत नाही. त्यापैकी काही जण जखमीचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकतात. जरी पोलीस आले तरी रुग्णवाहिका येण्यास उशीर होतो. अनेकदा गंभीर जखमी रुग्णास वायसीएम रुग्णालयातून ससून रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देतात. या कालावधीत मोठ्या प्रमाणावर वेळ वाया जात असल्यामुळे जखमींना वेळेत योग्य उपचार मिळत नसल्याने जीव गमवावा लागत आहे.पोलिसांकडून योग्य उपाययोजनावाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, नशा करणे आणि सिग्नल तोडणे ही अपघाताची प्रमुख कारणे असली, तरी रस्त्यावरील खड्डे आणि अशास्त्रीय गतिरोधक हेदेखील अपघातास कारणीभूत ठरत आहेत. तसेच वाहन चालविताना स्टंट करणे, वेगात वाहन चालविण्याची स्पर्धा लावणे, ट्रिपल सीट जाणे, सिग्नल तोडणे आदी प्रकारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून नियमांचा भंग केला जातो. या विद्यार्थ्यांकडे अत्याधुनिक दुचाकी असल्याने ते कधीच पोलिसांच्या हाती लागत नाहीत. शहराच्या मुख्य चौकाचौकांत वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना करण्यात येत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात