एलईडी हेडलाइटमुळे अपघात
By Admin | Updated: January 23, 2017 02:48 IST2017-01-23T02:48:05+5:302017-01-23T02:48:05+5:30
वाहनांच्या प्रखर एलईडी हेडलाइटमुळे नाणे मावळातील कामशेत-जांभवली आणि इतर रस्त्यांवर अपघात होत आहेत. नियमबाह्य

एलईडी हेडलाइटमुळे अपघात
करंजगाव : वाहनांच्या प्रखर एलईडी हेडलाइटमुळे नाणे मावळातील कामशेत-जांभवली आणि इतर रस्त्यांवर अपघात होत आहेत. नियमबाह्य हेडलाइट असलेल्या वाहनांच्या चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
नाणे मावळ या भागात जांभवली, थोरण, शिरदे, पाले नामा, उकसान, सोमवडी, भाजगाव, कोळवाडी, गोवित्री, उंबरवाडी, करंजगाव, साबळेवाडी, मोरमारवाडी, कांबरे, कोंडीवडे, नाणे, नवीन उकसान, नाणोली, साई, वाऊड, कचरेवाडी, घोणशेत व इतर वाड्या-वस्त्या आहेत.
तेथे जाण्यासाठी कामशेत ते जांभवली हा मुख्य रस्ता आहे. तसेच नाणे मावळात जाण्यासाठी अनेक छोटे-मोठे रस्ते असून, तेथून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. या शिवाय नाणे मावळातील कामगार वर्ग, विद्यार्थी, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. (वार्ताहर)