शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

खड्यामुळे महिलेचा गेला जीव : चिंचवडमधील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 13:25 IST

महिला दुचाकी वरून जात असताना रस्त्यात असलेला खड्डा चुकविताना त्यांची दुचाकी घसरली. त्यातच महिला बसच्या मागील चाकाखाली सापडल्याने तिचा मृत्य झाला

ठळक मुद्देखड्डा चुकवताना बसच्या चाकाखाली, चिंचवडमधील घटना अहिंसा चौकातील सकाळी साडेनऊची घटना

चिंचवड : अंदाज न आल्याने खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार महिला बसच्या चाकाखाली गेल्याने तिचा मृत्य झाला.ही दुर्दैवी घटना चिंचवडमधील अहिंसा चौकात सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

        प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहिती नुसार  पीएमपीएमएलची बस (एम एच १२ क्यु जी १६६३) चिंचवड गावाकडून चिंचवड स्टेशनकडे जात होती. याच दिशेने एक महिला दुचाकी वरून जात असताना रस्त्यात असलेला खड्डा चुकविताना त्यांची दुचाकी घसरली. त्यातच महिला बसच्या मागील चाकाखाली सापडल्याने तिचा मृत्य झाला.या घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव देसाई (पुर्ण नाव समजु शकले नाही)असे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

       अत्यंत वर्दळीचा असणाऱ्या या चौकात वारंवार छोटे-मोठे अपघात होत असतात.या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा भागात सम-विषम पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र याचे पालन होत नसल्याने वाहने मनमानी पद्धतीने रस्त्यावर उभी केली जातात.आज घडलेल्या अपघाता वेळी रस्त्यावर अनेक चारचाकी व दुचाकी वाहने लावण्यात आली होती.यामुळे हा रस्ता अरुंद झाला होता.दुचाकी वरील महिलेला या समस्येमुळे रस्ता मिळाला नाही.रस्त्याच्या मधोमध असणारा खड्डा व रस्त्यात उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले.घटनास्थळी चिंचवड पोलीस व वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.या अपघातानंतर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातDeathमृत्यूroad safetyरस्ते सुरक्षा