शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

अबब..! वर्षभरात ६५ कोटींचा दंड थकीत; बेशिस्त वाहनचालकांचा ‘टाॅप गिअर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 11:32 IST

- दंड वसुलीसाठी वाहतूक पोलिस ‘ॲक्शन मोड’वर

पिंपरी : शहरात दिवसेंदिवस बेशिस्त वाहनचालकांची संख्या वाढत आहे. त्यांच्याकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन हाेत आहे. पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून नियमित कारवाई सुरू आहे. यात २०२४ या वर्षभरात वाहतूक पोलिसांनी ६,४२,१४१ केसेस करून ७४ कोटी ६७ लाख ४३ हजार ६५० रुपयांचा दंड आकारला. त्यातील ९ कोटी ४९ लाख २१ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर ६५ कोटी १८ लाख २२ हजार ३५० रुपयांचा दंड थकीत आहे. दंड थकवणारे पोलिसांच्या रडारवर असून, दंड वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते प्रशस्त आहेत. असे असले, तरी बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. काही वाहनचालक विना हेल्मेट, विना सिटबेल्ट, नो पार्किंगमध्ये वाहन पार्क करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, ट्रिपल सिट, कर्णकर्कश हाॅर्न वाजवणे, सायलेन्सर बदलून वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून शहरातील मुख्य चौक, सिग्नल तसेच महामार्गांवरदेखील कारवाई करण्यात आली.कारवाई करूनही नियमांचे उल्लंघनबेशिस्त वाहनचालकांवर नियमित कारवाई करण्यात येत आहे. असे असले, तरी वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकार सुरूच आहेत. ट्रिपल सिट, विनाहेल्मेट, विनासिटबेल्ट, सिग्नल जम्पिंग, राँग साइड, मोबाइलवर बोलणे, काळी काच, नो पार्किंगमध्ये पार्किंग करणे, बीआरटी मार्गातून वाहन दामटणे, अशा विविध प्रकरणांमध्ये वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.दंड न भरल्यास खटला, नोटीसदंड थकित असल्यास संबंधित वाहन पुन्हा कारवाईत पकडल्यास दंड वसूल केला जातो. तसेच, न्यायालयात खटला दाखल होऊ शकतो. या अगोदर ज्या वाहनधारकांकडे ई-चलान थकीत आहे, अशा वाहनधारकांना लोकअदालतीत सहभागी होण्यासाठी व दंड भरण्यासाठी नोटीस पाठविण्यात येते.चौकांमध्ये दंडवसुलीथकीत दंड वसुलीसाठी वाहतूक पोलिसांकडून शहरातील मुख्य चौकांमध्ये वाहन तपासणी होणार आहे. दंड थकवल्याचे समोर आल्यास संबंधित वाहनधारकांवर कारवाई करण्यात येईल. हे टाळण्यासाठी संबंधित वाहनधारकांनी दंड भरून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेंतर्गत २०२४ या वर्षभरात केलेली कारवाईएकूण केसेस - एकूण दंड - पेड केसेस - पेड दंड - अनपेड केसेस - अनपेड दंड६,४२,१४१ - ७४,६७,४३,६५० - १,०४,२८६ - ९४,९,२१३०० - ५,३०,४७६ - ६५,१,८२,२३५०  

वाहनांवरील थकीत दंड वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वाहनधारकांनी दंड भरून सहकार्य करावे. वाहतूक नियमांचे पालन करावे. जेणे करून कारवाईला सामोरे जावे लागणार नाही. - बापू बांगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रRto officeआरटीओ ऑफीसPoliceपोलिस