शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलच्या स्वच्छतागृहामध्ये चित्रीकरणासाठी ठेवला मोबाईल; वेटरविरोधात गुन्हा दाखल

By रोशन मोरे | Updated: August 21, 2023 15:40 IST

त्यानुसार पोलिसांनी हॉटेलमधील वेटर ईरण्णा शिवण्णा पांढेर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.....

पिंपरी : हॉटेलमधील स्वच्छतागृहामध्ये मोबाईल ठेवून चित्रीकरण केले जात होते. हॉटेलमध्ये आलेला एक ग्राहक स्वच्छतागृहात गेल्यानंतर त्याला चित्रीकरण करण्यासाठी ठेवलेला मोबाईल दिसला. हा प्रकार गिता पावभाजी, आकुर्डी येथे रविवारी (दि.२०) उघडकीस आला. या प्रकरणी गौरव प्रकाश सुर्यवंशी (वय २८, रा.आकुर्डी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलमधील वेटर ईरण्णा शिवण्णा पांढेर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या ऑफीसमधील कर्मचारी आणि मित्रासोबत हॉटलेमध्ये गेले होते. त्यावेळी फिर्यादी यांच्यासोबतचा एक जण फ्रेश होण्यासाठी स्वच्छतागृहामध्ये गेला. त्यावेळी तेथे चित्रिकरणासाठी एका पेपरवर मोबाईल ठेवल्याचे दिसून आले. त्यानंतर फिर्यादी यांनी थेट पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. हा मोबाईल हॉटेलमध्ये काम करणा वेटरचा असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मिळालेल्या माहिती प्रमाणे, निगडी परिसरा असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेलच्या स्वच्छतागृहात चित्रिकरण करण्यासाठी मोबाईल ठेवला होता. हे स्वच्छतागृह कॉमन असून महिला आणि पुरूष ग्राहकांकडून त्याचा वापर केला जात होता. एका सजग ग्राहकामुळे स्वच्छतागृहात मोबाईल ठेवल्याचे उघड झाले.पोलीस निरीक्षक रंगनाथ उडे यांनी सांगितले की, वेटरला ताब्यात घेतले असून दाखल करण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड