शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

Pimpri Chinchwad: कंपन्यांमध्ये चोऱ्या करणारी टोळी जेरबंद; चोरीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर

By नारायण बडगुजर | Updated: December 13, 2023 18:38 IST

या टोळीतील प्रमुख गुन्हेगारांनी अल्पवयीन मुलांची टोळी बनवून त्यांच्या माध्यमातून चोऱ्या केल्याचे उघडकीस आले....

पिंपरी : रेकी करून पिंपरी-चिंचवडपुणे शहरात चोऱ्या करणाऱ्या उत्तर प्रदेशमधील टोळीला जेरबंद करण्यात आले. या टोळीकडून कंपन्यांमधील तांबे व इतर साहित्य चोरी केली जात होती. चिखली पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून २४ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या टोळीतील प्रमुख गुन्हेगारांनी अल्पवयीन मुलांची टोळी बनवून त्यांच्या माध्यमातून चोऱ्या केल्याचे उघडकीस आले.

अब्दुलकलाम रहिमान शहा (२३, रा. कुदळवाडी, चिखली. मूळ रा. उत्तर प्रदेश), योगेश तानाजी चांदणे (२६, रा. जाधववाडी, चिखली), रविशंकर महावीर चौरासिया (२३, रा. मोईगाव, ता. खेड. मूळ रा. उत्तर प्रदेश), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांचे साथीदार रिझवान खान, शकील मन्सुरी आणि दोन अल्पवयीन मुलांचा पोलिस शोध घेत आहेत.

पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून औद्योगिक परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्याबाबत चिखली पोलिस वारंवार ठिकठिकाणी सापळा लावत होते. दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी एक पथक तयार करून घरफोडी झालेल्या ठिकाणांची माहिती घेऊन तांत्रिक विश्लेषण करण्याच्या सूचना पथकाला दिल्या. या पथकाला गुन्हा घडलेल्या ठिकाणी येणारे संशयित इतर ठिकाणीही दिसले. त्यानुसार त्यांची ओळख पटवून अब्दुलकलाम याला चिखली पोलिसांनी चिखली येथून ताब्यात घेतले. तो चोरीचा माल विक्रीसाठी आला होता. त्याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात चोऱ्या केल्याचे सांगितले. चोरलेला माल वाहून नेण्यासाठी योगेश चांदणे याचा टेम्पो वापरत असत. पोलिसांनी योगेश चांदणे आणि रविशंकर चौरासिया या दोघांना टेम्पोसह ताब्यात घेतले. संशयितांकडून ग्राइंडर मशीन, पोपट पाना, चार्जेबल ट्यूब लाईट, ब्युटेन गॅस गन, लोखंडी छन्न्या, कुऱ्हाडीचे पाते, ड्रीलमशीन, स्टील बोल्ड कटर, हेक्सा फ्रेम, टी पाना, स्क्रू ड्रायव्हर, हातोडा असे घरफोडीसाठी लागणारे साहित्य जप्त केले.

चिखली, चाकण, दिघी, कोंढवा, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत संशयितांनी चोरीचे एकूण आठ गुन्हे केले. त्यात त्यांनी ५२ लाख ६५ हजार ९५८ रुपये किमतीचा ऐवज चोरला. पोलिसांनी संशयितांकडून २४ लाख ४५ हजार १४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलिस आयुक्त डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, सहायक निरीक्षक तौफिक सय्यद, पोलीस अंमलदार बाबा गर्जे, सुनील शिंदे, चेतन सावंत, विश्वास नाणेकर, भास्कर तारळकर, संदीप मासाळ, दीपक मोहिते, अमर कांबळे, कबीर पिंजारी, संतोष सकपाळ, संतोष भोर यांनी केली.

बंद असलेल्या कंपन्यांमध्ये चोरी

संशयित हे मुळचे उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. त्यांनी अल्पवयीन मुलांचा समावेश असलेली एक गुन्हेगारी टोळी बनवली. ते टोळीने पुणे शहरात येतात. एका ठिकाणी खोली भाड्याने घेऊन राहतात. त्यानंतर परिसरात रेकी करतात. विशेषतः ही टोळी बंद कंपन्यांमध्ये चोरी करते. रेकी करून बंद असलेल्या कंपन्यांमध्ये चोरी करत आणि चोरीचा माल टेम्पोमधून लंपास करत असत. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी