दारु पिण्यासाठी कोयत्याच्या धाकाने एकाला लुटले, भोसरीत भर चौकात घडला थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 08:59 AM2024-01-10T08:59:18+5:302024-01-10T08:59:47+5:30

तसेच त्याच्या खिशातील सतराशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे...

A coyote robbed one to drink alcohol, there was a thrill in Bhosari square | दारु पिण्यासाठी कोयत्याच्या धाकाने एकाला लुटले, भोसरीत भर चौकात घडला थरार

दारु पिण्यासाठी कोयत्याच्या धाकाने एकाला लुटले, भोसरीत भर चौकात घडला थरार

पिंपरी : दारु पिण्यासाठी पैशांची मागणी करत तीन जणांनी कोयत्याचा धाक दाखवत तरुणाला मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. ८) भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाखाली घडली. या घटनेत आरोपींनी तरुणाला मारहाण करत जखमी केले. तसेच त्याच्या खिशातील सतराशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

निलेश फकिरा काळे (वय ३१, रा. दिघी. मुळ गाव - लोहारा, जळगाव) यांनी या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुनिल जनार्धन सकट (वय ३२), दिपक रामकिशन हजारे (वय २७. दोघेही रा. लांडेवाडी, भोसरी) आणि पवन छगन उजगरे (रा. भोसरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकट आणि हजारे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळे हे त्यांचा मित्र साजन शेलार सोबत भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाखाली उभे होते. त्या वेळी त्यांच्या तोंडओळखीचे असलेले तीनही आरोपी तेथे आले. आरोपी सकट याने फिर्यादीच्या अंगावर कोयता उगारून त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, फिर्यादी यांनी त्यांना पैसे देण्यास विरोध केला. याचा राग आल्याने आरोपीने त्यांना मारहाण केली.

तसेच आरोपीने कोयत्याने वार करत त्यांच्या कानाला दुखापत केली. त्यानंतर आरोपी सकट याने शिवीगाळ करत फिर्यादी यांच्या शर्टच्या खिशात ठेवलेले एक हजार रुपये काढून घेतले. तर आरोपी हजारे याने फिर्यादी यांना खाली पाडून मारहाण केली. त्यानंतर आरोपी उजगरे याने फिर्यादी यांच्या पॅन्टच्या खिशातील ७०० रुपये काढून घेतले. या प्रकारानंतर आरोपींनी हातातील कोयते हवेत भिरकवत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे.

Web Title: A coyote robbed one to drink alcohol, there was a thrill in Bhosari square

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.