तळेगावकरांना ९०० डस्टबिनचे वाटप
By Admin | Updated: November 26, 2015 00:45 IST2015-11-26T00:45:46+5:302015-11-26T00:45:46+5:30
स्वच्छतेतून समृध्दीच्या वाटेने जाताना कच-याच्या त्रासाने हैराण तळेगावकरांना दिलासा देण्यासाठी नगरपालिकेवर अवलंबून न राहता विरोधी पक्षनेते सुनील शेळके

तळेगावकरांना ९०० डस्टबिनचे वाटप
तळेगाव स्टेशन : स्वच्छतेतून समृध्दीच्या वाटेने जाताना कच-याच्या त्रासाने हैराण तळेगावकरांना दिलासा देण्यासाठी नगरपालिकेवर अवलंबून न राहता विरोधी पक्षनेते सुनील शेळके यांनी स्वत: लाखो रूपये खर्च करुन ९०० डस्टबिनचे मोफत वाटप केले.
तळेगाव स्टेशन प्रभाग क्रमांक ३ मधे माजी उपनगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक सुशील सैंदाणे यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर, नगरसेविका सुजाता खेर, सुरेखा आवारे, शुभांगी शिरसाट, निलिमा दाभाडे, स्टेशन विभाग भाजपा महिला आघाडी अध्यक्षा संगीता शेळके, शोभा भेगडे, रजनी ठाकूर, ठेकेदार राजेंद्र नवले उपस्थित होते. सैंदाणे पुढे म्हणाले की, कच-याच्या गंभीर समस्येबाबत समन्वय नसल्याने सत्ताधारी, पदाधिकारी आणि ठेकेदारांना अपयश आले आहे. त्यामुळे शेळके यांचा हा उपक्रम नागरिकांना दिलासा देणारा आहे. नागरिकांनीही स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याबाबत स्वयंशिस्त पाळली पाहिजे.
शेळके म्हणाले, कच-याबाबत नागरिकांत असंतोषाची भावना आहे. घंटागाडी फिरकणार नाही तेंव्हाच या डस्टबिनमधे कचरा टाकावा. स्वच्छतेचे काम काही ठराविक प्रभागातच होत आहे. कच-याबाबत नगरपालिकेतच ताळमेळ नसल्याने वैयक्तिक स्तरावर हा प्रयत्न केला आहे. यापुढे घंटागाडीने डस्टबिनमधील कचरा उचलला नाही तर कार्यकर्ते तो नगरपालिकेत टाकतील.
यावेळी जांभूळकर, खेर, नितिन फाकटकर यांची भाषणे झाली. राजू जाधव, सदाशीव धोत्रे, भगवान शिंदे, संकेत गुंजाळ, मंगेश धुळे, मंगल जाधव, शारदा शेटे, रूक्मिणी क्षीरसागर उपस्थित होते. नगरसेवक निलेश लोणकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)