शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
4
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
5
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
9
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
10
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
11
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
12
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
13
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
14
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
15
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
16
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
17
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
18
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
19
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी: भाजप, काँग्रेसकडून बी फॉर्मचे वाटप; तीन-चार दिवसांत उमेदवारही ठरणार
20
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ

चुकांमुळे ८,८६७ आधार दुरुस्ती प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 02:15 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील टपाल कार्यालयांत आधार केंद्र उपलब्ध करुन दिले आहे.

- मंगेश पांडे पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील टपाल कार्यालयांत आधार केंद्र उपलब्ध करुन दिले आहे. या केंद्रांवर मागील आठ महिन्यांत नवीन आधार कार्ड अवघी ९१८ निघाली असून, यापूर्वी काढलेल्या कार्डांमध्ये दुरुस्ती करवून घेणाऱ्यांचीच संख्या तब्बल ८ हजार ८६७ इतकी आहे. त्यामुळे नवीन आधार कार्डांऐवजी चुकांमुळे ‘निराधार’ झालेल्या कार्डदुरुस्तीचीच संख्या अधिक वाढल्याचे दिसून येते.सध्या प्रत्येकाकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. शासनाद्वारे नागरिकाला बारा अंकी ओळख क्रमांक आहे. बँक खाते उघडण्यासह पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, तसेच वाहन परवाना असो, की पॅनकार्ड; आधार कार्डची आवश्यकता भासत आहे. यासाठी शासनामार्फत आधार केंद्र सुरु असून, या ठिकाणी ठरावीक कागदपत्रे सादर केल्यानंतर कार्ड उपलब्ध होत आहे.दरम्यान, टपाल कार्यालयातही आधार कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील २२ केंद्रांवर टपाल कार्यालयामार्फत ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या केंद्रांवर मार्च महिन्यापासून १५ नोव्हेंबर या आठ महिन्यांत पिंपरी-चिंचवड शहरातील ९१८ जणांनी नवीन आधार कार्ड काढले आहे, तर ८ हजार ८६७ जणांनी दुरुस्ती करवून घेतली आहे. त्यामुळे नवीन कार्ड काढणाºयांपेक्षा कार्डमध्ये दुरुस्ती करवून घेणाºयांचे प्रमाण आठपट अधिक असल्याचे दिसून येते. नवीन आधारकार्ड काढण्याचे प्रमाण कमी झाले आहे.>जन्मतारीख दुरुस्तीचे प्रमाण अधिकआधार कार्डची मोहीम सुरूझाली त्या वेळी सुरुवातीला कार्ड काढलेल्या नागरिकांच्या कार्डवर जन्मतारखेचे केवळ जन्मसाल टाकण्यात आले. तसेच पूर्ण नाव न टाकता सुरुवातीचे नाव, तसेच आडनाव नमूद करण्यात आले. यामुळे अशा कार्डधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.>नवीन आधारकार्ड काढण्याचे प्रमाण कमीदरम्यान, पासपोर्ट, पॅनकार्ड, बॅँक अकाउंट आदी कामकाजासाठी आधारकार्ड आवश्यक असताना त्यावर पूर्ण जन्मतारीख, पूर्ण नाव, अचूक पत्ताही असणे गरजेचे आहे. मात्र, कार्डमध्ये त्रुटी असल्यास मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे त्रुटी असलेल्या आधार कार्डमध्ये पुन्हा दुरुस्ती करून घ्यावी लागत असल्याने नवीन कार्डऐवजी दुरुस्ती करणाºयांचेच प्रमाण अधिक असून, यामध्ये जन्मतारखेची दुरुस्ती करणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते.>नवीन तसेच दुरुस्ती करवून घेणाºयांची केंद्रनिहाय संख्याआधार केंद्र नवीन दुरुस्तीकार्डआकुर्डी ०० २३९औंध कॅम्प १६ २७९भोसरी (आयई) १९ २३०भोसरीगाव ५६ ४४४चिंचवड स्टेशन ११० ६६७चिंचवडगाव १ ९१सीएमई १ २९दापोडी १५ ११०दिघी कॅम्प १४ ४३३इन्फोटेक पार्क १८० १५५३कासारवाडी ८० २५४आधार केंद्र नवीन दुरुस्तीकार्डखडकी २३ २८२खडकीबाजार ० १३६पीसीएनटी १५ १७१पिंपळे गुरव ३ ३८६पिंपरी कॉलनी १६६ ११२४पिंपरी (पीएफ) ४८ १२१७पुणे कॅन्टोन्मेंट ७७ ५३९(इस्ट)इंद्रायणीनगर ० ६३दक्षिण खडकी ७ १९४रुपीनगर १९ १२५

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड