मावळ तालुक्यात ८६.०३ टक्के मतदान

By Admin | Updated: August 5, 2015 03:25 IST2015-08-05T03:25:27+5:302015-08-05T03:25:27+5:30

मावळ तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ८६.०३ टक्के मतदान झाले. ३१६ जागांसाठी ७१९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले

86.03 percent voting in Maval taluka | मावळ तालुक्यात ८६.०३ टक्के मतदान

मावळ तालुक्यात ८६.०३ टक्के मतदान

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ८६.०३ टक्के मतदान झाले. ३१६ जागांसाठी ७१९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. कामशेत वगळता मावळ तालुक्यात शांततेत मतदान झाले.
मतदानप्रक्रिया संपल्यावर सायंकाळी तळेगाव दाभाडे येथील पु. वा. परांजपे हायस्कूल येथे निवडणूक कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटर मशिन व इतर साहित्य जमा केले असून, गुरुवारी सकाळी ९ वा. मावळ तहसील कार्यालय, महसूल भवन येथे मतमोजणी होणार असल्याची माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली.
मावळ तालुक्यातील ताजे , कुरवंडे , कुसगाव पमा , आढे , उर्से , करंजगाव , बऊर , साई , गहुंजे , वारु , येलघोल , शिवली , शिवणे , थुगाव , तिकोणा , अजिवली , माळेगाव बुद्रुक , नाने , वेहरगाव , सोमाटणे , दारुंब्रे , खांडशी ,शिरदे , आपटी , महागाव , कार्ला , साते , टाकवे बुद्रुक , वडेश्वर , आंबी , चिखलसे , कशाळ , नवलाख उंब्रे , डाहुली , धामणे , सांगवडे , परंदवडी , कुसगाव खुर्द , घोणशेत , उकसान , मळवंडी ठुले , कोथुर्णे , मोरवे , येळसे , पाटण , मळवली व कुसगाव बुद्रुक या ४७ ग्रामपंचायतींमध्ये शांततेत मतदान झाले. मतदारांनी दुपारी १२ पर्यंत रांग लावून मतदान केले. मतदानास युवा मतदारांचा मोठा उत्साह होता. वृद्ध व्यक्तींनी मतदानाचा हक्क बजाविला. ४७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या ३१६ जागासाठी रिंगणात असलेल्या ७१९ उमेदवारांचे १३८ मतदान केंद्रात ८६.०३ टक्के मतदान करण्यात आले.
एका मतदान केंद्रावर १ मतदान केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी, १ शिपाई व १ पोलीस कर्मचारी असे ६ कर्मचारी नियुक्त केले असून, मतदान प्रक्रियेसाठी ३८ निवडणूक निर्णय अधिकारी, १८० मतदान केंद्राध्यक्ष व ५४० मतदान अधिकारी एकूण ७५८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.
निवडणूक कर्मचारी, व्होटिंग मशिन व इतर साहित्याची वाहतूक करण्यासाठी ३५ वाहने नियुक्त केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या २० जीप, महाराष्ट्र शासनाच्या १३ एसटी बस व २ जीप अशी एकूण ३५ वाहने नियुक्त केली आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदानप्रक्रिया संपल्यावर इलेक्ट्रॉनिक व्होटर मशीन व इतर साहित्य मंगळवारी सायंकाळी तळेगाव दाभाडे येथील पु.वा. परांजपे हायस्कुल येथे जमा करण्यात येण्यात आले. ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मत मोजणी गुरुवार, दि. ६ आॅगस्ट रोजी ९ :३० वा. मावळ तहसीलदार महसूल भवन येथे होणार असून, एका वेळी २० टेबल लावण्यात येणार आहे. मतमोजणीचा निकाल ऐकण्यासाठी लाउड स्पीकर लावण्यात येणार आहे. (वार्ताहर)

Web Title: 86.03 percent voting in Maval taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.