शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

लग्न जुळवण्यासाठी ८० फुटांवर; अग्निशामक दलाच्या जवानांची उडाली धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 06:53 IST

रावेतजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मोठ्या क्रेन लावल्या असून, त्या क्रेनवर दुपारी बाराच्या सुमारास एक गृहस्थ चढून ८० फूट उंचीवर गेला.

पिंपरी : रावेतजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मोठ्या क्रेन लावल्या असून, त्या क्रेनवर दुपारी बाराच्या सुमारास एक गृहस्थ चढून ८० फूट उंचीवर गेला. वर जाऊन लोकांचे लक्ष वेधण्यासाठी तो आवाज देऊ लागला. आत्महत्या करण्यासाठी तो गेला असावा, असा समज झाल्याने पोलीस, अग्निशामक दल यांची अक्षरश: तारांबळ उडाली. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांना तो म्हणाला, ‘‘मी आत्महत्या करण्यासाठी नव्हे, तर मनातील भावना व्यक्त करण्यासाठी उंचीवर गेलो होतो. माझे लग्न जुळवून द्यावे, एवढीच विनंती आहे.’’ असे म्हणणारा हा गृहस्थ एचआयव्हीग्रस्त असून, मानसिक रुग्ण आहे.मूळचा मराठवाड्यातील, परंतु पिंपरी-चिंचवडमध्ये नातेवाइकांकडे आलेला हा ३९ वर्षांचा गृहस्थ मानसिक रुग्ण झाला आहे. वयाच्या २०व्या वर्षी त्याला एचआयव्ही लागण झाली. एचआयव्हीग्रस्त आहे, हे लक्षात आल्यानंतर नातेवाईक, मित्रमंडळी त्याच्यापासून दूर जाऊ लागली. तो एकटा पडला. कोणाबरोबर मिसळता येत नाही. कोणी आपल्या भावना जाणून घेत नाही. त्यामुळे त्याचे मानसिक खच्चीकरण झाले आहे.मानसिक रुग्ण झाल्याने रविवारी दुपारी तो उड्डाणपुलाच्या कामासाठी लावलेल्या क्रेनवर गेला. ८० फूट उंच क्रेनवर जाऊन मोठमोठ्याने ओरडू लागला. कोणीतरी प्रेमवीर असावा, असे वाटल्याने तेथे बघ्यांची गर्दी झाली. तो आत्महत्येसाठी गेला असावा, या भीतीने नागरिकांनी देहूरोड पोलिसांना, तसेच अग्निशामक दलाला कळविले. अग्निशामक दलाचे जवान तेथे हजर झाले. त्यांनाही तो कशासाठी गेला आहे हे समजेना? अग्निशामक दलाच्या जवानांपैकी एकजण त्याच्याशी बोलत बोलत क्रेनवर गेला. त्याला खाली उतरण्याची विनंती केली. माझे लग्न जुळवून देणार असाल, तरच खाली येतो, असे म्हणू लागला.

टॅग्स :marriageलग्नpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड