शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

​​​​​​​पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीतून ८ जण बाहेर; भाजपातील तिघांचा समावेश?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 17:50 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती सीमा सावळेंसह भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ जण बाहेर पडले असून त्या जागी कोणाची वर्णी लागणार याबाबत महापालिका वतुर्ळात चर्चा रंगली आहे.

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीमध्ये १६ सदस्यनवीन आठ सदस्यांची फेब्रुवारी महिन्याच्या महासभेत केली जाणार निवड

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती सीमा सावळेंसह भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ जण बाहेर पडले असून त्या जागी कोणाची वर्णी लागणार याबाबत महापालिका वतुर्ळात चर्चा रंगली आहे. सत्ताधारी भाजपाने चार जणांचे राजीनामे घेतल्याचे वृत्त आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. यामध्ये भाजपाचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचा एक तर अपक्ष एक असे सदस्य आहेत. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर बाहेर पडतात. ही नावे चिठ्ठी काढून निश्चित केले जातात. बुधवारच्या स्थायी सभेत सदस्यांचा ड्रॉ काढण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. परंतु, सभा दुपारी दोन वाजता होणार होती. ती तीनला सुरू झाली. त्यामुळे स्थायीतील भाजप नगरसेवकांमध्ये खलबते सुरू होती. भाजपातील काही सदस्य राजीनामे देण्यास उत्सुक नसल्याचीही चर्चा रंगली होती. त्यामुळेच सभेला उशीर झाल्याची चर्चा होती. सभेत ड्रॉ. काढण्यात आला. त्यात भाजपाच्या सभापती सीमा सावळे, आशा शेंडगे, हर्षल ढोरे, कोमल मेवाणी, उषा मुंढे, कुंदन गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर, अनुराधा गोफणे या दहा जणांच्या नावाच्या चिठ्ठया काढण्यात आल्या. त्यानंतर नवीन आठ सदस्यांची फेब्रुवारी महिन्याच्या महासभेत निवड केली जाणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस