अग्निशामक दलाचे ७० जवान तैनात
By Admin | Updated: September 27, 2015 01:16 IST2015-09-27T01:16:59+5:302015-09-27T01:16:59+5:30
पिंपरी-चिंचवड शहरात गणेश मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेकडून ३२ ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे. या घाटांवर अग्निशामक दलाचे ७० जवान तैनात राहतील

अग्निशामक दलाचे ७० जवान तैनात
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गणेश मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेकडून ३२ ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे. या घाटांवर अग्निशामक दलाचे ७० जवान तैनात राहतील. यामध्ये ५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यासह क्रीडा विभागाचे १० जीवरक्षकही असतील, अशी माहिती अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांनी दिली.
प्रत्येक घाटावर लाइफ जॅकेट, लाइफ रिंग, दोर आणि गळ असतील. यासह सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक, निर्माल्य कुंड ही यंत्रणाही तैनात असेल. गर्दी होत असलेल्या पिंपरी आणि मोशी येथील घाटांवर बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. अग्निशामक दलाची दोन वाहने आणि २५ ठिकाणी विसर्जनासाठी हौद बांधण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)