एलबीटी अभय योजनेचा ६७० जणांनी घेतला लाभ
By Admin | Updated: August 4, 2015 03:42 IST2015-08-04T03:42:17+5:302015-08-04T03:42:17+5:30
महापालिकेच्या वतीने एलबीटी थकीतदारांसाठी अभय योजना राबविण्यात आली आहे. अभय योजनेस १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

एलबीटी अभय योजनेचा ६७० जणांनी घेतला लाभ
पिंपरी : महापालिकेच्या वतीने एलबीटी थकीतदारांसाठी अभय योजना राबविण्यात आली आहे. अभय योजनेस १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ३१ जुलैपर्यंत या योजनेचा लाभ शहरातील ६७० व्यापाऱ्यांनी घेतला असून, त्यातून १० कोटी ३ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
पन्नास कोटींची उलाढाल असणाऱ्यांना एक आॅगस्टपासून एलबीटी लागू झाली आहे. शहरातील केवळ ६५ व्यापारी एलबीटीच्या कक्षेत येतात. त्यामुळे एलबीटीतून मिळणारे उत्पन्न घटणार आहे. ३१ जुलैअखेर मिळालेल्या उत्पन्नातही चढ-उतार दिसून येतो. एप्रिल २०१४-१५ला एलबीटीतून ६२.१४ कोटी, स्टॅम्प ड्युटीतून ७.१५ कोटी, एक्सकॉर्टमधून १.१६ असे ७०.२६ कोटी उत्पन्न मिळाले होते. तर या वर्षी याच महिन्यात एलबीटीतून ८३.३० कोटी, स्टॅम्प ड्युटीतून ८.७४ कोटी, एक्सकॉर्टमधून शून्य असे ९२.०४ कोटी उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी २१.२९ कोटींची वाढ झाली होती. गेल्या वर्षी मे महिन्यात एलबीटीतून ७१.७३ कोटी, स्टॅम्प ड्युटीतून ८.२९ कोटी, एक्सकॉर्टमधून १.२१ असे ८१.२३ कोटी उत्पन्न मिळाले होते. तर या वर्षी याच महिन्यात एलबीटीतून ६९.१५ कोटी, स्टॅम्प ड्युटीतून ८.७४ कोटी, एक्सकॉर्टमधून शून्य असे ७७.७९ कोटी उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी ३.३४ कोटीची तूट झाली होती.
गेल्या वर्षी जून महिन्यात एलबीटीतून ७३.६४ कोटी, स्टॅम्प ड्युटीतून ९.१९ कोटी, एक्सकॉर्टमधून १.१८ असे ८४.०१ कोटी उत्पन्न मिळाले होते. तर या वर्षी याच महिन्यात एलबीटीतून ६९.२२ कोटी, स्टॅम्प ड्युटीतून ९.५० कोटी, एक्सकॉर्टमधून शून्य असे ७८.७२ कोटी उत्पन्न
मिळाले होते. (प्रतिनिधी)