शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

डेटिंग साईटच्या नादात कर्मचाऱ्याला ६५ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 20:29 IST

एका सुंदर तरुणीबरोबर डेटवर जाण्याबद्दल होती जाहिरात...

ठळक मुद्दे जाहिरातीतील आमिषापोटी त्याला गमवावे लागले तब्बल ६५ लाख रुपये

पिंपरी :  मोबाईलवरील एका जाहीरातीतील डेटिंग संकेतस्थळावर क्लिक करणे कर्मचाऱ्याला महागात पडले. जाहिरातीतील आमिषापोटी त्याला तब्बल ६५ लाख रुपये गमवावे लागले. ही घटना १८ मे ते २० सप्टेंबर २०१९ या कालावधीत राजे शिवाजीनगर चिखली येथी घडली आहे.चिखली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत विश्वनाथ ढाळे (वय ४०, रा. मोरया पार्क, राजे शिवाजीनगर, चिखली) यांनी  फिर्याद दिली आहे. ढाळे हे एका कंपनीत काम करीत असून १८ मे २०१९ रोजी त्यांनी इंटरनेटवर गूगल सर्चच्या माध्यमातून डेटिंग साईट बघितल्या. त्यावर एका सुंदर तरुणीबरोबर डेटवर जाण्याबद्दल जाहिरात होती. जाहिरातीतील मोबाईल क्रमांकावर ढाळे यांनी संपर्क केला असता त्यांना प्रथम रजिस्ट्रेशन करायला सांगितले. रजिस्ट्रेशन केल्यानंतर डेटिंगची पुढील सेवा मिळेल, असेही सांगिण्यात आले. त्यानुसार, रजिस्ट्रेशन करण्यासाठी ढाळे यांनी इंडियन बँकेच्या खात्यावर १२०० रुपये भरले. ढाळे यांनी जाहिरातीत मागितलेली सर्व व्यक्तिगत माहिती फॉर्ममध्ये भरली. फॉर्म सबमिट करताच ढाळे यांना संबंधित साईटवरून फोन यायला लागले. डेटवर जाण्यासाठी आधी काही पैसे जमा करण्याची आवश्यकता असून, हे पैसे डेट झाल्यानंतर परत करण्यात येतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे ढाळे यांनी काही रक्कम इंडियन बँकेच्या अकांऊंटवर भरली. या सर्व प्रकाराला एक आठवडा उलटून गेला तरी आणखी पैशांची मागणी होऊ लागली. त्यामुळे ढाळे यांना संशय आला. आपले सर्व पैसे परत हवे असून अकाऊंट डिलीट करायचे आहे, असे नमुद करताच संपर्क करणाºया मुलीने अकाऊंट डिलीट करण्यासाठी आणखी पैसे भरा, असे सांगितले. मात्र, ढाळे यांनी नकार दिला. त्यामुळे डेटींग साईटने प्रोफाईल क्लोजर, होल्डिंग चार्ज, अकाउंट व्हेरिफिकेशन, प्रोफाईल मॅचिंग, कमिशन अशा कारणांसाठी आणखी पैसे भरण्यास भाग पाडले.  तब्बल ६५ लाख रुपये उकळले.  सायबर सेलने तपास करून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWomenमहिलाfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस