५९ जणांची माघार

By Admin | Updated: February 6, 2017 21:21 IST2017-02-06T21:21:25+5:302017-02-06T21:21:25+5:30

५९ जणांची माघार

59 retired people | ५९ जणांची माघार

५९ जणांची माघार

 

महापालिकेची निवडणूकीसाठी अर्ज माघारीचा आज पहिला दिवस होता. सायंकाळी पाच पर्यंत शहरातील अकरा निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज माघारीची सोय केली होती. एकुण ३२ प्रभागांसाठी अ, ब,क,ड अशा जागासाठी अर्ज दाखल केले होते. त्यात ५९ जणांनी अर्ज मागे घेतले. यात काही उमेदवारांनी स्वतच्या सुरक्षिततेसाठी एकपेक्षा अधिक अर्ज भरले होते. काहींनी घरातील व्यक्तींचे अर्ज भरले होते. अशा अनेकांनी अर्ज मागे घेतले आहेत. तसेच काही उमेदवारांनी एकपेक्षा अधिक अर्ज दाखल केले होते. त्यानीही अर्ज मागे घेतले आहेत.  प्रभाग तीन मधील क गटातून विद्यमान नगरसेवकांच्या पत्नी सुजाता आल्हाट यांनी , प्रभाग पाच ड मधून माजी नगरसेवक अमृत सोमाजी पºहाड, प्रभाग सहा मधील क मधून माजी नगरसेविका सुलोचना बढे, प्रभाग नऊ ब मधून माजी विरोधी पक्षनेते राहूल भोसले, प्रभाग दहा ड मधून सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांचे चिरंजिव कुशाग्र कदम, प्रभाग सतरामधील ड प्रभागातून काँग्रेसचे नेते, नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांचे चिरंजीव हर्षवर्धन भोईर, प्रभाग एकोणीस अ मधून नगरसेवक गणेश लोंढे, प्रभाग २४ ड मधून माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, प्रभाग २७ अ मधून नगरसेवक गोरक्ष लोखंडे यांनी अर्ज मागे घेतला आहे.    

भाजपाच्या दोन उमेदवारांची अधिकृत माघारी

महापालिकेतील निवडणूकीत उमेदवारी मिळविण्यासाठी मारामारी सुरू असताना मिळालेली उमेदवारीतून माघारीचे प्रकार भाजपात घडले आहेत. प्रभाग पाचमधून माजी नगरसेवक अमृत सोमाजी पºहाड यांना उमेदवारी दिली होती. तर प्रभाग क्रमांक २५ ब मधून रेश्मा बारणे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी माघार घेतली आहे. भारतीय जनता पक्षांच्या दोन अधिकृत उमेदवारांनी माघार घेतली आहे. राष्टÑवादीने उमेदवारी नाकारलेल्या उमेदव

 

ारांना पुरस्कृत करण्याची खेळी खेळली जात आहे.

 

Web Title: 59 retired people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.