प्रेक्षागृहाच्या दुरुस्तीसाठी ५८ लाख

By Admin | Updated: June 19, 2016 04:39 IST2016-06-19T04:39:35+5:302016-06-19T04:39:35+5:30

तब्बल २० वर्षांनंतर दुरुस्तीसाठी सज्ज असलेले प्रा. रामकृष्ण मोरे पे्रक्षागृह साधारणत: दोन महिन्यांच्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. ५ जून ते ६ आॅगस्ट या काळात रसिक, कलावंतांना

58 million for the repair of the auditorium | प्रेक्षागृहाच्या दुरुस्तीसाठी ५८ लाख

प्रेक्षागृहाच्या दुरुस्तीसाठी ५८ लाख

- किरण माळी,  चिंचवड
तब्बल २० वर्षांनंतर दुरुस्तीसाठी सज्ज असलेले प्रा. रामकृष्ण मोरे पे्रक्षागृह साधारणत: दोन महिन्यांच्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. ५ जून ते ६ आॅगस्ट या काळात रसिक, कलावंतांना कार्यक्रम, तसेच सादरीकरणाला मुकावे लागणार आहे. प्रस्तावित ५८ लाख रुपये खर्चून देखभाल व दुरुस्तीमध्ये सर्वच प्रकारच्या समस्या सोडविण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.
या प्रेक्षागृहाचे उद्घाटन १९९४मध्ये झाले. शहरातील सर्वांत जास्त म्हणजे बाराशे आसनक्षमता असणारे हे प्रेक्षागृह आहे. दिवसाला १६ कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम पाहतात. प्रेक्षागृहाच्या दोन्ही बाजूस पिण्याच्या पाण्याचे दोन कुलर आहेत.
पहिल्या टप्प्यातील कामात प्रेक्षागृहात संपूर्ण बैठक व्यवस्था बदलण्यात येणार आहे. सन्मानिका रांगेतील खुर्च्या पूर्णपणे बदलण्यात येणार आहेत. त्यामागील रांगेतील खुर्च्यांचे कापड, तसेच कुशन बदलले जाणार आहे. यापैकी ३५० खुर्च्यांची दुरुस्ती होणार आहे, तर ७०० खुर्च्यांचे कापड बदलले जाणार आहे.
सभागृहातील मॅट बदलून कार्पेट व पीव्हीसी मॅट बसविण्यात येणार आहेत. स्टेज पॉलिशिंगही केले जाणार आहे. विंगेतील पडदे, तसेच प्रोजेक्टरचा पडदाही नवीन बसविला जाणार आहे. अ‍ॅकॉस्टिक मटेरियलचे नूतनीकरण केले आहे. मागील बाजूस असलेले तिकीटघर पुढील बाजूस सुरू करण्यात येणार असून, जुन्या तिकीटघराच्या जागेत नाट्य परिषदेचे कार्यालय होणार आहे.
कलावंतांसाठी आवश्यक असणाऱ्या ग्रीन रूमचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. प्रसाधनगृहाला रंग देण्याचे कामही होणार आहे. स्वच्छतागृहातील कामे, तसेच मूलभूत सुविधाही उलब्ध होणार आहेत.

दोन टप्प्यांत प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणाचे काम होणार आहे. त्यांपैकी आतील भागातील दुरुस्ती व नूतनीकरणाची कामे सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक स्तरावर आवश्यक असलेली कामे पूर्ण झाल्यानंतर सुमारे तीन कोटींची निविदा काढून बाहेरील भाग प्रशस्त करणे, कॅफेटेरिया - कलादालन उभारणे, म्युरल्स तसेच दर्शनी भागातील कामे प्रस्तावित आहेत. काही महिन्यांतच दुसऱ्या टप्प्यातील कामे घेतली जाणार आहेत.
- केशव फुटाणे, उपअभियंता, स्थापत्य विभाग

वीस वर्षांनंतर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. उपलब्ध सोयींचा योग्य वापर करण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता असणे आवश्यक आहे. नाट्यगृहासारख्या संस्था लोकसहभागातून देखभाल करणे शक्य आहे. स्वच्छतागृहांचा योग्य वापर, पाण्याचा वापर, संस्था व परिसरातील स्वच्छता याबाबत नागरिकांनी दक्ष असले पाहिजे. विहित वेळेत दुरुस्तीचे काम पूर्ण व्हावे व प्रेक्षागृह पूर्ववत सुरू व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे.
- अविनाश जाधव, व्यवस्थापक

Web Title: 58 million for the repair of the auditorium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.